‘रंगीला’ गर्ल उर्मिला मातोंडकर आहे ‘एवढ्या’ संपत्तीची मालकीण, राहते ‘या’ आलिशान घरात, किंमत ऐकून भोवळ येईल..

बॉलीवूडची रंगीला गर्ल अर्थात उर्मिला मातोंडकर सध्या फिल्मी दुनियेपासून लांब आहे. पण उर्मिला अनेक दिवसांपासून राजकारणात सक्रिय झाली आहे. अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये राज्य केल्यानंतर उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला आहे तसेच आपल्याला माहित असेल कि तिने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि राजकारणात देखील तिला आता चांगलेच यश मिळत आहे.
पण उर्मिला राजकारणासोबतच तिच्या वैयक्तिक आयूष्यामूळे देखील नेहमीच चर्चेत असते. सध्या उर्मिला लाइमलाईटपासून दुर असली तरी ती करोडोंच्या संपत्तीची मालकिण आहे. अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये मेहनत केल्यानंतर तिला हे यश मिळाले आहे त्यामुळे ती तिच्या लाईफस्टाईलमूळे नेहमीच चर्चेत असते.
आपणास सांगू इच्छितो कि उर्मिला मुंबईत तिच्या नवऱ्यासोबत अलिशान घरात राहते. तसेच उर्मिलाच्या मुंबईतील या घराची किंमत तब्ब्ल ६५ करोड रुपये आहे आणि तिने या घराच्या सजावटीसाठी देखील करोडो रुपये खर्च केले आहेत. उर्मिला एकूण ५०० करोड पेक्षा अधिक संपत्तीची मालकिण आहे.
त्यासोबतच तिला महागड्या गाड्यांची देखील खुप आवड आहे. त्यामूळे ती अनेक महागड्या गाड्यांची देखील मालकिण आहे. तसेच निवडणुकीच्या वेळी तिने स्थावर मालमत्तेत वांद्रे येथे ४ फ्लॅट्स असल्याचं देखील जाहीर केलं होत.
एवढेच नाही तर उर्मिलाचे मुंबईपासून दुर थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच पाचगनीमध्ये शानदार फार्म हाऊस देखील आहे आणि या फार्म हाऊसची किंमत तब्ब्ल ९८ करोड रुपये इतकी आहे. तसेच तिने फार्म हाऊसच्या सजावटीसाठी अनेक मोठ्या डिझायनरची मदत घेतली होती. अनेक दिवस काम केल्यानंतर तिने फार्म हाऊसची सजावट पुर्ण केली होती.
तसेच उर्मिला मातोंडकरकडे असलेल्या ४१ कोटींच्या जंगम मालमत्तेत शेअर्स, बॉण्ड्स, म्युच्युअलफंड असे मिळून २८.८ कोटी आहेत. तसेच एका मर्सिडिज कारचाही समावेश आहे. तसंच स्थावर मालमत्तेत वांद्रे येथे त्यांचे चार फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सची किंमत सध्याच्या बाजार भावानुसार जवळपास २७.३४ कोटी रुपये इतकी आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ती या फार्म हाऊसमध्ये राहत होती. ती अनेक वेळा पती आणि तिच्या तीन कुत्र्यांसोबत फार्म हाऊसमध्ये राहायला जाते. करोडोंच्या संपत्तीची मालकिण असणाऱ्या उर्मिलाला चित्रपटांपासून दुर निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते.
4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत उर्मिलाचा जन्म झाला. बालकलाकार म्हणून अॅक्टिंग करिअरची सुरुवात करणा-या उर्मिलाने पुढे रंगीला, सत्या, मस्त अशा अनेक सिनेमांत काम केले. वयाच्या 42 व्या वर्षी उर्मिलाने उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर उर्मिला बॉलिवूडपासून दूर आहे. उर्मिलाने 2016 मध्ये कश्मिरी व्यावसायिक मोहसिन अख्तर मीरशी लग्न केले. मोहसिन उर्मिलापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ती कार्यक्रमात अनेकदा पती मोहसिनसोबत दिसते.