येऊ कशी तशी… मालिकेला या अभिनेत्रीने ठोकला रामराम; आता ही अभिनेत्री घेणार जागा

मालिका आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याचा अगदी अविभाज्य असा घटक बनलेल्या आहेत. जोपर्यंत, मालिका बघितल्या नाही तोपर्यंत दिवस पूर्ण झाला असं वाटतच नाही. काही मालिकांनी तर इतकी जास्त लोकप्रियता मिळवली आहे की, आज त्यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशा अनेक मालिका आहेत.
मात्र, थोड्या हटकेकथानकावर आधारित मालिका जेव्हा मेकर्स सुरु करतात तेव्हा ती मालिका चालेल कि नाही अशी रिस्क तर असते. पण अनेक मेकर्स ती रिस्क घेतात आणि मालिका सुरु करतात. बऱ्याच वेळा अशा हटके कथानकावरील मालीका देखील सुपरहिट ठरतात. रंग माझा वेगळा, सुंदरा मनात भरली, स्वाभिमान या मालिका त्याच हटके कथानकांपैकी आहेत.
या सर्वच मालिकांचा टीआरपी चांगला आहे, आणि मालिकेतील जवळपास सर्वच पात्र प्रचंड प्रसिद्धदेखील झाले आहेत. अशाच थोड्या हटके कथानकावर आधारित ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने चांगलीच चर्चा रंगवली होती. स्वीटू आणि ओमची प्रेमकहाणी अनेकांच्या मनात बसली.
यामध्ये, मालविका खानविलकर या पत्रामधून, मराठीची प्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधारने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. तिने थोडी निगेटिव्ह भूमिका साकारली असली तरीही, तिची भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली. सोबतच, ओमची आई म्हणजेच, शकुंतला खानविलकरची भूमिका देखील चांगलीच लोकप्रिय झाली.
ओम आणि स्वीटूच्या, प्रेमकथेमध्ये शकुंतलाने खारीचा वाटा उचलला म्हणून तिचे पात्र अनेकांच्या अगदी आवडीचे ठरले. मात्र, आता याच शकुंतला म्हणजेच शुभांगी गोखले आता, ही मालिका सोडणार असल्याचे समोर आले आहे. मात्र, चाहत्यांनी नाराज होण्याची गरज नाहीये कारण आता त्यांची जागा, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री किशोरी आंबिये घेणार आहे.
किशोरी आंबिये, माघील अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीमधे काम करत आहेत. त्यांनी अनेक, मराठी सिनेमामध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. सरकारनामा, वन रूम किचन, माझा नवरा तुझी बायको, बॉईझ २, सालीने केला घोटाळा, शुभ लग्न सावधान, सारख्या सुपरहिट मराठी सिनेमामध्ये त्यांनी काम केले आहे.
सध्या किशोरी आंबिये, सहकुटुंब सहपरीवार या मालिकेमध्ये काम करत आहेत. त्या मालिकेमध्ये त्यांनी, मामीची भूमिका त्यांनी रेखाटली. त्यांच्या या भूमिकेला देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. पण आता, शुभांगी गोखलेच्या जागी किशोरी आंबियेला चाहते स्वीकार करतील का, हे बघणे नक्कीच रंजकच ठरेल. शुभांगी गोखले मालिका का सोडत आहेत, याबद्दल कोणताही खुलासा झाला नाहीये. पण किशोरी आंबिये नक्कीच त्यांची उणीव भासू देणार नाही, असं मेकर्सच मत आहे.