‘या’ सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झालेला आहे घ’टस्फो’ट, 5 नंबर जोडी होती पूर्ण महाराष्ट्राची फेव्हरेट…

असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात. मात्र, याला काही अपवाद देखिल ठरतात. याचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये घ’टस्फो’टाचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकमेकांशी न जमणे, मतमतांतरे यामुळेच घ’टस्फो’टाचे प्रमाण हे वाढीस लागलेले आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतले तर घ’टस्फो’ट घेण्याची वेळ येत नाही. असा काहीसा आपल्या समाजामध्ये समज आहे.
मात्र, असे असले तरी अनेक जण छोट्या छोट्या कारणावरून भांडण करायला लागतात. त्यामुळे त्यांचा संसार टिकत नाही. सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात हा प्रसंग फार कमी प्रमाणात आलेला असतो. मात्र, सेलिब्रिटींच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग नित्यनियमाने येत असल्याचे पाहायला मिळते. आज आम्ही आपल्याला अशाच घ’टस्फो’टाबद्दल माहिती देणार आहोत. म्हणजे मराठी सेलिब्रिटींनी कोणी कोणी घ’टस्फो’ट घेतलेले आहेत याबाबत माहिती घेणार आहोत. तर मग जाणून घेऊया..
1) सई ताम्हणकर अमेय गोस्वामी – आपल्या दिलखेचक अदांनी सई ताम्हणकर हिने अनेकांना तयार केलेले आहे. तिच्या अदांनी अमय गोस्वामी देखील घायाळ झाला. दोघेही एकाच क्षेत्रात काम करत होते. तो प्रत्यक्ष चित्रपटात काम करत नाही. तो चित्रपटाच्या पडद्यामागचा कलाकार आहे. सई आणि अमेय यांनी 2013 मध्ये लग्न केले होते. त्याआधी त्यांनी काही वर्षे डेटिंग देखील केले होते. मात्र, काही वर्षात या दोघांचा संसार मोडला. त्यानंतर दोघांनीही घ’टस्फो’ट घेतला.
2) स्वप्निल जोशी अपर्णा जोशी – प्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी याची देखील दोन लग्न झालेले आहेत. सुरुवातीला त्याने अपर्णा जोशीसोबत लग्न केले होते. मात्र काही वर्षानंतर दोघांचा घ’टस्फो’ट झाला. त्यानंतर त्याने औरंगाबादच्या लीना अराध्येसोबत लग्न केले आहे. या दोघांना आता एक मुलगी आहे त्याचे नाव मायरा असे आहे.
3) शर्मिष्ठा राउत, अमेय निपाणकर – शर्मिष्ठा राऊत हिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या उंच माझा झोका या मालिकेतील तिची भूमिका खूप गाजली होती. त्यानंतर तिला अनेक मालिका मिळाल्या. शर्मिष्ठा हिने अमेय निपांकर याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचा घ’टस्फो’ट झालेला आहे. शर्मिष्ठा सध्या सिंगल आहे.
4) रुपाली भोसले, मिलिंद शिंदे – रुपाली भोसले हिने अनेक मालिकांमधून काम केलेले आहे. रूपाली हिने मिलिंद शिंदे यांच्यासोबत 2012 मध्ये लग्न केले होते. तसेच बिग बॉस मध्ये सुद्धा ती दिसली होती. मात्र, काही वर्षातच दोघांचा घ’टस्फो’ट झाला होता. सध्या ती अंकित मगरे याला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघे लवकरच लग्न करतील, अशी शक्यता आहे.
5) तेजश्री प्रधान, शशांक केतकर – काही वर्षांपूर्वी होणार सुन मी या घरची ही मालिका छोट्या पडद्यावर आली आणि प्रचंड धुमाकूळ या मालिकेने घातला होता. या मालिकेने अफलातून यश मिळवले. मालिकेच्या सेटवर शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रेमप्रकरणाची गाडी सुरू झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, दोघांचा लवकरच घ’टस्फो’ट झाला. त्यानंतर शशांक याने प्रियांका ढवळेशी लग्न केले तर तेजश्री मात्र अजूनही सिंगलच आहे.
6) महेश मांजरेकर – महेश मांजरेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमधून काम देखील केले. तसेच अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांचे दीपा यांच्यासोबत सुरवातीला लग्न आले होते. मात्र, कालांतराने त्यांचा तिच्याशी घ’टस्फो’ट झाल्यानंतर त्यांनी मेधा मांजरेकर यांच्यासोबत लग्न केले आहे. मेधा मांजरेकर यांनी काकस्पर्श या चित्रपटात काम केले.
7) गिरीश ओक – गिरीश ओक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. अग बाई सासुबाई या मालिकेतील त्यांची अभिजीत राजे ही भूमिका चांगली गाजत आहे. त्यांनी केलेल्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे होते. तिच्या पासुनच त्यांना गिरीजा ओक गोडबोले ही मुलगी आहे. त्यानंतर त्यांनी पल्लवी यांच्यासोबत लग्न केले.
8) रेशम टिपणीस – रेशम टिपणीस बिग बॉस मुळे पुन्हा चर्चेत आली होती. संजीव सेट यांच्यासोबत तिने लग्न केले होते. मात्र, 2004 मध्ये त्यांचा घ’टस्फो’ट झाला होता. सध्या ती एका व्यक्तीला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे.