‘या’ व्यक्तीसोबत सारा अली खान ला घालवायचंय संपूर्ण आयुष्य, म्हणाली या व्यक्ती शिवाय मी…

बॉलिवूड पदार्पणातच केदारनाथ आणि सिंबा सारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी तिच्या आउटफिट्सची चर्चा होते तर कधी कार्तिक आर्यनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत असते.
लवकरच ती कार्तिक सोबत इम्तियाज अली यांच्या एका सिनेमात दिसणार आहे. सारा आणि कार्तिकनं अद्याप त्यांच्यातील नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरीही चाहते मात्र या जोडीवर खूश आहेत. पण सारानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान केलेल्या एका वि’धानमुळे तिच्या चाहत्यांनाही ध’क्का बसू शकतो.
साराने दिलेल्या एका मुलाखतीत सारानं आपल्या लग्नाचा प्लान सांगितला आणि याचवेळी तिनं लग्नानंतर तिला तिचं संपूर्ण आयुष्य कोणासोबत काढायचं आहे याचाही खुलासा केला. तिने तिच्या अधिकृत अकाउंटवर फोटो शेअर करत असताना साराने हे विधान केलं आहे.
तिची दिनश्चर्यादेखील ती तिच्या चाहत्यांना सांगत असते. आई अमृताच्या जन्मदिनीही तिने पुन्हा एक फोटो शेअर करत त्यासोबत भावुक मेसेज लिहिला आहे. माझी आई माझी संपूर्ण दुनिया आहे असं म्हणत तिने लिहिलं, ‘माझ्या दुनियेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझा आरसा, माझी ताकद आणि माझी प्रेरणा बनल्याबद्दल मी तुझे आभार मानते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आई.’
तसेच तिने लिहिलं आहे कि, ‘माझ्या आईसोबत मला आयुष्यभर राहण्याची माझी इच्छा आहे. मी जेव्हा तिला हे सांगिते तेव्हा तिला खूप काळजी वाटते. कारण तिच्याकडे माझ्या लग्नाचा पूर्ण प्लान आहे. मी नेहमी तिच्यासोबत बाहेर जाते. पण तिच्यापासून जेव्हा मी काही दिवसांसाठी दूर जाते तेव्हा मात्र मला तिची खूप आठवण येते.
सारा आणि अमृता एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत. त्या एकमेकांसोबत राहणं जास्त पसंत करतात. तिची आईचं तिची चांगली मैत्रीण असल्याचं सारा नेहमी सांगते. त्यादोघीतला ऋणानुबंध कधीही न तुटणारा असल्याचंदेखील साराचं म्हणणं आहे. त्या दोघी सोबतचं फिरायला जातात.
सारा तिच्या आईसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.एका मुलाखतीमध्ये साराने म्हटले होते की, तिला तिच्या आईसोबत संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. साराने म्हटलं, ‘आयुष्यभर मला माझ्या आईसोबत राहायचं आहे. जेव्हाही मी माझ्या आईसोबत बोलते तिला माझी काळजी वाटायला लागते, कारण तिला माझ्या लग्नाची चिंता असते. पण मी लग्नानंतरही माझ्या आईसोबतचं राहणार आहे, असे तिने म्हटले आहे.