‘या’ मराठी अभिनेत्याच्या घरी एकाच वेळी हलले ‘दोन’ पाळणे ! झाला जुळ्या मुलांचा बाप..नाव ठेवलं …!

सोशल मीडिया आपल्या सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक बनला आहे. आपल्याला होणार आनंद, दुःख अश्या वेगवेगळ्या भावना व्यक्त कारण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा सगळेच वापर करतात. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बाबी, अनेकजण सोशल मीडियावरुन सर्वांसोबत शेअर करत असतात.
त्यामध्ये सर्वसामान्यच काय तर, सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटीज देखील चांगलेच अग्रेसर असलेले आपल्याला बघायला मिळते. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या बबाबी हे सेलिब्रिटीज अगदी सहजपणे, सोशल मीडियाच्या साहाय्याने आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामध्ये बॉलीवूडचं काय मराठी चित्रपटसृष्टीमधले कलाकार देखील आहेत.
असाच एक मराठी अभिनेता सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. संकर्षण कऱ्हाडे, नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. अनेक मालिका आणि नाटकांडमध्ये संकर्षणने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. वेगवेगळ्या भूमिकांना समर्थपणे न्याय देणारा अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याला ओळखलं जातं.
नुकतंच संकर्षणने एक आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. संकर्षण बाबा झाला आहे, आणि यातही आनंदाची बातमी म्हणजे त्याच्या पत्नीने आवळ्या-जावळ्या मुलांना जन्म दिला आहे. संकर्षणला एक मुलगा आणि एक मुलगी अशी ट्विन्स बाळं झाली आहेत. त्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याने आपला एक फोटो शेअर करत, ही आंदनवार्ता आपल्या चाहत्यांना दिली.
त्याची ही पोस्ट बघताच चाहत्यांनी त्यावर, लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच सुरु केला आहे. अरे व्वा, आता आनंद द्विगुणित झालाय! अभिनंदन दोन वेळा! असे अनेक कमेंट्स चाहते त्याच्या या पोस्टवर करत आहेत. आपल्या चिमुकल्या बाळांसोबत त्याने एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे.
यामध्ये आपल्या छोट्या दोन्ही बाळांकडे संकर्षण अगदी मायेने आणि प्रेमाने बघत आहे. त्याने या फोटोसोबतच त्यांची नाव देखिल सांगितले आहेत. त्यांच्या मुलीचे नावं स्रग्वी तर मुलाचे नाव सर्वज्ञ असं ठेवले आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या संकर्षणची ही आजवरची सर्वात सुंदर पोस्ट आहे, असं देखील काही नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे.
त्याने आपल्या पोस्टमध्ये मुलांची नाव आणि त्याच अर्थ देखील सांगितला आहे. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणनारा , ज्ञानी आणि स्रग्वी म्हणजे पवित्रं तुळस असा या दोन्ही नवजात चिमुकल्यांच्या नावाचा अर्थ आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये त्याने काम केला आहे. माझीया प्रियाला प्रीत कळेना, आभास हा अश्या मराठी मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.
सोबतच, रामराम महाराष्ट्राचे त्याने सूत्रसंचालन केले आहे. लोभ असावा, मी रेवती देशपांडे या नाटकांमध्ये देखील त्याने काम केलं आहे. संकर्षण उत्तम अभिनयासोबतच उत्तम कविता देखील करतो. अनेकवेळा आपल्या सोशल मीडियावरून तो आपल्या कविता चाहत्यांपर्यंत शेअर करत असतो.