‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सौन्दर्यावर फिदा होता शेखर सुमन, तिच्यासोबत काम करण्यास फुकटात झाला होता तैय्यार..

मनोरंजन
हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये असे काही अभिनेते आहेत की, ज्यांनी आजवर एकही रुपया न घेता चित्रपटात काम केलेले आहे. यामध्ये अनेक अभिनेत्यांनी आपले मानधन न घेता येतील यामध्ये आपल्याला महानायक अमिताभ बच्चन यांचे देखील नाव घेता येईल. अमिताभ बच्चन यांनी एकलव्य या चित्रपटामध्ये केवळ एक रुपया मानधन घेतले होते.
हा चित्रपट विधू विनोद चोप्रा यांनी बनवला होता. त्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटानंतर चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना रोल्स रॉयल ही महगडी कार देखील भेट दिली होती.
त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर ही बाब समोर आली होती की, अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी केवळ एक रुपये मानधन घेतले. त्यामुळे चोप्रा यांनी एवढे महागडे गिफ्ट त्यांना दिले होते.याप्रमाणे बॉलीवूडमध्ये अनेक असे अभिनेते आहेत की, ज्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच मोहित केले आहे.
यामध्ये आपल्याला अभिनेता शेखर सुमन याचे नाव घेता येईल. शेखर सुमन हा जुन्या काळातील अभिनेता आहे. मात्र, असे असले तरी आपल्या फिटनेसने त्याने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शेखर सुमन याचे वय सध्या 58 वर्षे आहे. त्याचा जन्म 7 दिसंबर 1962 मध्ये झालेला आहे. शेखर सुमन यांनी काही वर्षांपूर्वी केलेला अनुभव हा चित्रपट आपल्या लक्षात असेलच.
अनुभव या चित्रपटात त्यांनी अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. या चित्रपटाची चर्चा देखील त्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतरही शेखर सुमन यांनी अनेक चित्रपटात काम केले. शेखर सुमन यांनी अनेक रिॲलिटी शो मध्ये देखील काम केल्याचे आपण पाहिले आहे. आपल्या अनेक वक्तव्यानंतर तो कायम चर्चेत असतो.
तसेच काही वक्तव्य केल्यानंतर तो वादात देखील सापडतो. असे असले तरी शेखर सुमन याची अनेक जण तारीफ करताना देखील आढळतात. शेखर सुमन यांनी काही दिवसांपूर्वीच एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा त्याचा चित्रपटाशी संबंधित आहे. दिग्दर्शक सुदर्शन रंजन हे एका चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटाचे नाव आबोध असे होते.
या चित्रपटामध्ये त्यांना एका अभिनेत्रीला घ्यायच होते. रंजन यांनी आधी शेखर सुमन यांना याबाबत विचारणा केली आणि त्यांना सांगितले की, माझ्याकडे चित्रपटात मानधन देण्यासाठी पैसे नाही. तू माझ्यासोबत काम करशील का? आपण या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीला भेटायला जाऊ. त्यावर शेखर सुमन हे तयार झाले आणि रंजन यांच्यासोबत अभिनेत्रीला भेटायला गेले.
एका ठिकाणी गेल्यानंतर काही वेळ ते वाट पाहत बसले. त्यानंतर समोरून एक अभिनेत्री आली. तिचे नाव होते माधुरी दीक्षित. शेखर सुमन यांनी माधुरी हिला पाहता क्षणीच रंजन याला सांगितले की, मी तुझ्या चित्रपटात एक रुपया मानधन न घेता काम करण्यास तयार आहे. शेखर सुमन हे माधुरी दीक्षितच्या सौंदर्यावर तेव्हा भाळले होते.
त्यानंतर शेखर सुमन यांनी माधुरी दीक्षित हिची आपल्या पत्नीशी देखील भेट करून दिली होती. शेखर सुमन यांच्या पत्नीने माधुरी दीक्षित हिला काही कपडे आणि मेकअप चे सामान देखील गिफ्ट दिले होते, अशी आठवण शेखर सुमन यांनी सांगितली आहे.