‘या’ फोटोत दडले आहेत बॉलिवूडचे 3 सुपरस्टार, पैकी 2 आहे प्रसिद्ध अभिनेत्री तर एक आहे प्रसिद्ध अभिनेता..तुम्ही त्यांना ओळखलं का?

आपल्या बॉलिवूडमधील,अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना बघितले ही जणू अप्सराच आहेत की काय असा भास होतो. कमनिय बांधा, आकर्षक व्यक्तिमत्व आणि सुंदर चेहरा या जोरावरती बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी आपला जम बसवला आहे. काही अभिनेत्रींचा बॉलिवूड सुपरस्टार बनण्याचा प्रवास अगदी स्वप्न सारखाच आहे.
अनेक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी, वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करत होत्या. त्यापैकी बऱ्याच अभिनेत्री मॉडलिंग क्षेत्रात काम करत होत्या. मॉडेलिंग क्षेत्रात काम करून एखाद्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्यास कोणीच ती दवडत नाही; असे आपण बऱ्याच अभिनेत्रींच्या बाबतीत पाहिले आहे.
आज बिपाशा बासू हे बॉलीवूड मधील सगळ्यात मोठ्या नावांपैकी एक आहे. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बिपाशाने मॉडलिंग करियर मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर, बिपाशाने अनेक म्युझिक अल्बम मध्ये काम केले, व त्यामधूनच तिला प्रसिद्धी मिळाली. तिची लोकप्रियता इतकी वाढली की, तिला सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
कॅटरिना कैफ देखील सुरुवातीच्या काळात मॉडेल म्हणून अनेक डिझायनरच्या रॅम्पवर चालली आहे. मात्र तीचे अभिनेत्री बनण्याचे त्याचे स्वप्न सलमान खानने पूर्ण केले. समीरा रेड्डी ही एक अभिनेत्रीसोबत अगदी यशस्वी मॉडेल देखील आहे. आजही आपले करियर मॉडलिंग असल्याचेच ती म्हणते. अनेक मिस इंडिया बनलेल्या मॉडेल्स अभिनेत्री आहेत.
जुही चावला पासून ते मानसी चिल्लर पर्यंत सर्वांनी मॉडलिंग मध्ये आपले हातखंडे आजमावले होते. अशाच अभिनेत्रींपैकी दीपिका पादुकोण आणि सोफी चौधरी देखील आहेत. दीपिका पादुकोणने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणूनच केली होती. हिमेश रेशमियाच्या नाम हे तेरा या म्युझिक अल्बम मध्ये दीपिकाला काम करण्याची संधी मिळाली.
त्यानंतरच, तिचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र झाले व त्याच मित्रांच्या मदतीने तिला ओम शांती ओम मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र दीपिकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज बॉलीवूडच नाही तर जगातली नावाजलेली सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून दीपिकाचे नाव घेतले जाते. सध्या दीपिका आणि तिच्यासोबत काही अभिनेत्रीचा एक फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे.
थ्रो-बॅक थर्सडे या ट्रेंड खाली प्रसिद्ध फॅशन डिझायनर ने आपला जुना फोटो शेअर केला आहे. फॅशन डिझाइनर सोबत दीपिका पादुकोण, कटरीना कैफ आणि सोफी चौधरी या अभिनेत्रींनी काम केले होते. थॉमस हे आंतरराष्ट्रीय बेस्ट ड्रेस डिझाईनर आणि टॉमी हिलफिगर या संस्थेचे संस्थापक देखील आहेत.
सुरवातीच्या काळात, मॉडलिंग करियर मध्ये टॉमी हिलफिगर सारख्या कंपनीसोबत काम करण्याचे सर्वच मॉडेल्सचे स्वप्न असते. याच थॉमस यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये काही अंतरराष्ट्रीय मॉडेल्स सोबत आपल्या बॉलिवुडच्या मॉडेल्स देखील बघायला मिळत आहे. दीपिका, कटरीना आणि सोफी चौधरी या फोटोमध्ये असून देखील ओळखल्या जात नाहीये.
दीपिका पादुकोण सगळ्यात बाजूला ब्लॅक कलर चा टॉप आणि जीन्स मध्ये आहे, तर कतरिनाने ब्राऊन पेंट आणि तसाच ब्राऊजर घातलेला आहे; पिंक टॉप आणि ब्लू जीन्स हा सोफीचा पेहराव आहे. मात्र प्रथमदर्शनी या फोटोमध्ये या तिन्ही अभिनेत्रींना ओळखणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.