‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत का? चित्रपट नाही तर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आहे डंका; पहा फोटो..

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत का? चित्रपट नाही तर बॉडीबिल्डिंग क्षेत्रात आहे डंका; पहा फोटो..

आपल्या वडिलांनी ज्या क्षेत्रात प्रगती केली आहे, नाव कमवल आहे. त्याच क्षेत्रात मुलांनी प्रवेश करायचा आणि आपल्या वडिलांच्या नावाचा फायदा करुन घेऊन स्वतःच करियर बनवायचं. हे अगदी सगळीकडेच खूप साहजिकच बाब आहे.

राजकारण, वकिली, डॉक्टरकी आणि खास करून अभिनय या क्षेत्रांमध्ये आपल्याला हेच सर्व बघायला मिळत. मात्र, काही असे देखील कलाकार असतात जे आपल्या मुलांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून देण्यात मदत करतात. आपल्या मुलांनी स्वतःची वेगळी ओळख बनवावी, वेगळं क्षेत्र निवडून तिथे प्रगती करावी असे देखील काहींना वाटतात.

आणि अशाच अगदी आधुनिक विचारांचे आहेत, हे दिग्ग्ज अभिनेते. प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता, नागेश भोसले यांना नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. केवळ मराठी किंवा हिंदीच नाही तर त्यांनी अनेक साऊथच्या सिनेमामध्ये देखील काम केले आहे. नागेश भोसले यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये काम केले आहे.

कधी भन्नाट विनोदी पात्र तर कधी अगदी नि’र्दयी विलीनचे पात्र अशी जवळपास सर्वच प्रकारचे पात्र त्यांनी रेखाटले आहेत. त्यांच्या भलामोठा चाहतावर्ग आहे. मात्र मराठी मालिका देवयानी मध्ये त्यांनी आबासाहेबांची भूमिका रेखाटली होती आणि त्यातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. याच नागेश भोसले यांनी आपल्या मुलीच्या स्वप्नाना पंख दिले.

आपल्या मुलीचे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी तिला पूर्ण साथ दिली आहे. नागेश भोसले यांची मुलगी कुहू कमालीची सुंदर आहे. शिवाय दिसायला देखील आकर्षिक आहे. कोणीही तिला सहज अभिनेत्री म्हणून काम दिल असत. मात्र तिने वेगळ्या करियरची निवड केली आणि नागेश भोसले यांनी देखील आपल्या मुलीची साथ दिली.

बॉडीबिल्डिंग मध्ये, नागेश यांची मुलगी कुहू हिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या देशामध्ये महिलांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्र निवडण हे फारच कमी आहे. परंतु हा एक उत्तम खेळ आहे आणि जागतिक पातळीवर अनेक महिलानीया क्षेत्रात नाव कमवलं आहे. संपूर्ण जगातून क्रीडा स्पर्धेत खूप कमी महिला नाव कमवत असतात आणि त्यामुळे माझ्या मुलीनी घेतलेल्या निर्णयाने मला फारच आनंद झाला.

तिच्यावर मी कधीही कोणते क्षेत्र निवडावे यासाठी दबाव टाकला नाही, असे नागेश म्हणतात. अवघ्या सतरा वर्षांची असताना कुहुने या क्षेत्राची निवड केली. आणि आज २३ वर्षाची कुहू भारतात फिटनेस कोच आणि एकमेव बिकिनी अथेलेट आहे. जागतिक स्तरावर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पियाडमध्ये तिन ब्राँझ मेडल पटकावलं होतं.

ती नेहमीच वूमन बिकनी फिटनेस स्पर्धे मध्ये भाग घेत असते आणि त्यासाठी तिने अनेक पदकं देखील पटकावली आहेत. परदेशातील अनेक महिला बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आहेत मात्र भारतात त्याचे खूप कमी प्रमाण आहे हे क्षेत्र महिलांसाठी खुले आहे याबद्दलची माहिती भारतामध्ये खूप कमी लोकांना आहे.

ही स्पर्धा पाहिल्यानंतर मी या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार फिटनेस ट्रेनिंग आणि डाएट फॉलो करत देशातील टॉप बिकनी ऍथलेट बनले, असे कुहू सांगते. पुढे ती बोलते माझी आई जॉय भोसले आणि वडील नागेश भोसले हे दोघेही अभिनय क्षेत्राशी निगडित आहे परंतु त्यांनी कधीही मला अभिनेत्री बनण्यासाठी दबाव नाही टाकला.

माझ्या आवडीचे करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. जे कराल त्याचा फक्त आनंद घ्या असे मला माझे आई-वडील बोलतात. आणि मी ही हिंमत दाखवली आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरता या क्षेत्रात उतरले.

रॅम्पवर जाऊन मला कधीही लज्जास्पद वाटले नाही. या क्षेत्रात महिला येण्यापासून घाबरत आहेत मात्र मी याच क्षेत्रात नाव कमावले आहे, पदक पटकावले आहेत. आणि भारताचे नाव उंचावले आहे हा खेळ भारतातही प्रसिद्ध व्हावा यासाठी माझे अतोनात प्रयत्न चालू आहेत असे देखील कुहू बोलते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.