‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रविना टंडनच्या हातावर केली होती ‘उलटी’, पहा अशी झाली होती तिची वाईट अवस्था..

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रविना टंडनच्या हातावर केली होती ‘उलटी’, पहा अशी झाली होती तिची वाईट अवस्था..

रविना टंडन बॉलिवूडची ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. तिने अजय देवगण सोबत आलेल्या फुल और कांटे चित्रपटातून बॉलिवूडमद्ये पदार्पण केले होते. पण तिला खरी ओळखलं मिळाली ती मोहरा चित्रपटुन. मोहरा चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते.

त्यांना पुढे तिने अक्षय कुमारसोबत अनेक चित्रपटात काम केले. त्यामुळे अक्षय कुमार सोबत रविणाचे नाव जोडले गेले. अक्षयनंतर अजय देवगणसोबत अ’फेयर सुरु झाले पण असे असले तरी तिने डायरेक्टर अनिल तादानी सोबत लग्न केलं. पण आज आपण रविनाचा एक किस्सा शेअर करणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.

रवीना टंडनचे वडील रवी टंडन हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आहेत. त्यामुळे रवीनाची आर्थिक परिस्थिती ही लहानपणापासूनच खूपच चांगली होती. पण मुलांनी स्वतः मेहनत करून पैसे कमवले पाहिजे असे रवीनाच्या वडिलांचे म्हणणे होते आणि त्यासाठी त्यांनी दोन्ही मुलांना लहान वयापासूनच पैशाचे महत्त्व पटवून दिले होते.

तिच्या भावाला आणि तिला कपाट स्वच्छ केल्यास अथवा गाडी धुतल्यास ते पैसे देत नसत. तेव्हापासून पैशांची किंमत काय असते याची रवीना आणि तिच्या भावाला जाणीव झाली होती. रवीना कॉलेजमध्ये असताना देखील कॉलेज सांभाळून काम करत होती. ती केवळ आठवीत असताना तिने सुट्टीमध्ये तिच्या वडिलांना एका चित्रपटासाठी असिस्ट केले होते.

दहावी झाल्यानंतर तिने प्रल्हाद कक्कर यांच्या जाहिरात एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्याचवेळी तिला शंतनू शौरे या फोटोग्राफर्सने मॉडलिंगसाठी फोटो काढण्यासाठी तिला विचारले होते. पण मी इतकी सुंदर नाहीये असेच रवीनाचे म्हणणे असल्याने तिने कक्कर यांच्याकडेच काम करणे पसंत केले होते. ती त्यावेळी जुहूला राहात होती.

जुहूवरून ती बस पकडून सांताक्रूझला जायची आणि सांताक्रूझवरून ट्रेनने महालक्ष्मीला जात असे. महालक्ष्मीवरून तिचे ऑफिस जवळ असल्याने ती चालत ऑफिसला जात असे. सकाळी सात ते साडे दहा या वेळात कॉलेजला जाऊन ती त्यानंतर ऑफिसला जात असे. अनेकवेळा तिला घरी पोहोचायला रात्रीचे दहा-अकरा होत असे.

जास्त उशीर झाला तर ती ट्रेनने न जाता टॅक्सीने जात असे अथवा तिची मैत्रीण फराह खान म्हणजेच संजय खान यांची मुलगी तिला घरपर्यंत लिफ्ट देत असे. प्रल्हाद कक्कर यांच्याकडे काम करत असतानाचा एक किस्सा ती कधीच विसरू शकत नाही. ती कक्कर यांच्याकडे काम करत होती, तेव्हा अभिनेता आफताब शिवदासानी हा केवळ दहा वर्षांचा होता.

तो एका चॉकलेटच्या जाहिरातीत काम करत होता. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण चित्रीकरणाच्यावेळी स्टुडिओची फरशी देखील अनेक वेळा रवीना पुसत असे. आफताबचे चित्रीकरण सुरू असताना अनेक वेळा तिने फरशी पुसली होती आणि त्यात रिटेकमुळे आफताबने २४ ते २५ डेरिमिल्क खालल्याने त्याला उलटीसारखे व्हायला लागले होते.

त्याने फरशीवर उलटी केली तर फरशी पुन्हा पुसावी लागणार याची भीती रवीनाच्या मनात होती. त्यामुळे आफताबला उलटीसारखे होत आहे असे रवीनाच्या लक्षात आल्यानंतर तिने लगेचच तिचा हात पुढे केला होता आणि चिमुकल्या आफताबने तिच्या हातावरच उलटी केली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *