‘या’ दिग्गज मराठी कलाकारांच्या मुलींचे कधीही न पाहिलेले फोटोज्..4 नंबर ने केले आहे शाहरुखसोबत काम….

आपल्या मराठी सिनेश्रुष्टीतील काही दिगग्ज कलाकारांनी मराठी प्रमाणे हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाची ओळख करून दिली. बॉलिवूडमध्ये आजही त्याचे नाव लौकीक आहे. त्याचप्रमाणे आता त्यांचे मुलं देखील चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर काहींनी अभिनय सोडून दुसरा मार्ग निवडला आहे. चला तर मग बघुयात त्यांचे फोटो आणि ते काय करतात.
1. ईशानी आठले महिलावर्गाची प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल – आठले यांनी मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपटांकडे वळवले. अलका आणि समीर या जोडीला ईशानी नावाची एक मुलगी आहे. ईशानी ही दिसायला खूपच सुंदर आहे परंतु तिने अभिनय क्षेत्र निवडता, वैमानिक(पायलट) होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
2. मृण्मयी लागूआपल्या अभिनयातील साधेपणामुळे प्रेक्षकांच्या प्रसिद्धीत उतरणाऱ्या स्वर्गीय रिमा लागू यांना मृण्मयी नावाची मुलगी आहे. मृण्मयी हिने अनेक मोठ्या चित्रपटात काम केले आहे. पिके, दंगल, थ्री इडीयट्स, थप्पड अशा अनेक चित्रपटातून ती दिसून आली आहे. मृण्मयी ही विवाहित आहे.
1. स्वानंदी बेर्डे : मराठीतील कॉमेडीचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेला स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांना स्वानंदी नावाची एक मुलगी आहे. या दोघांचा मुलगा अभिनय हा चित्रपटसृष्टीत नाव कमवीत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु आता स्वानंदी देखील अभिनय क्षेत्रात उतरली आहे. “मन येड्यागत झालय” या मराठी चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे.
4. श्रेया पिळगावकर :मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध जोडीपैकी एक सचिन सुप्रिया यांना एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव श्रिया पिळगावकर असून तीपण अभिनयक्षेत्रात आहे. सचिन पिळगावकर निर्मीत “एकुलती एक” चित्रपटातून श्री यांनी मराठी मध्ये पदार्पण केले. तसेच श्रिया शाहरुख खान च्या फॅन चित्रपटात देखील झळकली आहे.