‘या’ मराठी कलाकारांच्या आई देखील आहेत आघाडीच्या दिगग्ज अभिनेत्री, पहा त्यांचे खास फोटो..

‘या’ मराठी कलाकारांच्या आई देखील आहेत आघाडीच्या दिगग्ज अभिनेत्री, पहा त्यांचे खास फोटो..

गेल्या काही वर्षापासून बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टी तसेच मालिकांमध्ये अभिनेता अभिनेत्री काम करत असताना त्यांचे मुले देखील मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात काम करत असल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी हा ट्रेंड नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षापासून हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात मराठीत देखील रुजत आहे.

हिंदीमध्ये हा ट्रेंड पहिल्यापासूनच आहे. मात्र, मराठीत आता अनेक अभिनेता व अभिनेत्री चे मुले देखील या क्षेत्रात येताना दिसत आहेत. आज आम्ही आपल्याला याउलट माहिती देणार आहोत. ज्या दिग्गज अभिनेत्री आहेत त्यांचे मुलं देखील या क्षेत्रात काम करतात, त्या अभिनेत्री कोण आहेत, हे आम्ही आपल्या सांगणार आहोत.

1. सिद्धार्थ चांदेकर: सिद्धार्थ चांदेकर हा एक उत्कृष्ट असा अभिनेता आहे. तो गेल्या काही महिन्यापासून जिवलगा या मालिकेत दिसत आहे. ही मालिका प्रचंड चालत आहे. या मालिकेला प्रेक्षकवर्ग देखील तेवढाच मिळालेला आहे. अनेक जण कुटुंबासह ही मालिका पाहत असतात. या मालिकेमध्ये सीमा चांदेकर या दिसल्या आहेत. सीमा चांदेकर या सिद्धार्थ चांदेकर यांच्या आई आहेत. दोघेही या मालिकेत उत्कृष्ट असे काम करत आहेत.

2.सखी गोखले : सखी गोखले ही देखील एक आजच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे, असे म्हणावे लागेल. ती अनेक मराठी मालिकांमधून दिसत असते. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमध्ये तिची भूमिका ही सर्वांनाच आवडली आहे. तिची आई म्हणजे शुभांगी गोखले. शुभांगी गोखले यांनी आजवर अनेक मालिकांतून काम केलेले आहे. विशेष करून त्यांची श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका चांगलीच गाजली होती.

3. अभिनय बेर्डे : अभिनय बेर्डे याने ती सध्या काय करते या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. अभिनय बेर्डे याचे आई-वडील आपल्याला माहीत असतील अजूनही बर्डे याच्या आईचे नाव प्रिया बेर्डे असे आहे. वडिलांचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे होते.

4.श्रिया पिळगावकर: श्रिया पिळगावकर हिने काही चित्रपटात काम केले आहे. मात्र, तिला म्हणावे तसे यश मिळालेच नाही. श्रिया पिळगावकर यांच्या वडीलाचे नाव सचिन पिळगावकर तर आईचे नाव सुप्रिया पिळगावकर असे आहे. दोघेही दिग्गज अभिनेते आहेत. या दोघांप्रमाणे श्रिया पिळगावकर हिला काही यश मात्र मिळाले नाही. तू मॉडेलिंग करत असते.

5.विराजस कुलकर्णी: छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या माझा होशील ना या मालिकेत आदित्य याची भूमिका साकारणारा विराजस कुलकर्णी हा सध्या चांगलाच चर्चेत आलेला आहे. विराजस याची आईदेखील अभिनेत्री आहे. त्याच्या आईचे नाव मृणाल कुलकर्णी असे आहे. मृणाल या अभिनेत्री आहेत. आपल्या आई सोबत काम करायला आपल्याला भीती वाटते, असे देखील विराजस याने सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.