‘या’ अभिनेत्रीमूळे के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्यात पडली फूट!

‘या’ अभिनेत्रीमूळे के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्यात पडली फूट!

आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये, खेळाडू आणि अभिनेत्री किंवा मॉडेल्स यांच्या कित्येक प्रेमकथांचे उदाहरण आपल्याला बघायला मिळते. क्रिकेट आणि ग्लॅमर दुनियेचे तर जणू एक अतूट असे नाते आहे. आणि हेच आपण वारंवर बघत आलो आहे. क्रिकेट कितीही मोठा असला तरी, कोणती ना कोणती अभिनेत्री किंवा मॉडेलच त्याची विकेट काढते असे नेहमीच मस्करीमध्ये ऐकायला मिळते.

रवी शास्त्री पासून अलीकडे हार्दिक पंड्या पर्यंत, सर्वच क्रिकेटर्स च्या अफेअरच्या चर्चा ऐकायला मिळतात. क्रिकेट आणि बॉलीवूडचे तर खूपच घनिष्ठ असे नाते आहे असेच नेहमी पाहायला मिळाले आहे. अझहर आणि संगीता बिजलानी यांची प्रेमकथा असेल किंवा युवराज आणि दीपिका ची.

काही प्रेमकथा पूर्ण होतात तर काही केवळ चर्चा रंगवतात. मात्र काही प्रेमकहाणी, एक सुंदर असे उदाहरणच प्रस्थापित करतात. अलीकडच्या काळात, क्रिकेट आणि बॉलीवूड यांचा चांगलंच मेळ बसलेला दिसत आहे.

विराट आणि अनुष्का असेल, किंवा युवराज आणि हेजल, तसेच जहीर हान आणि सागरिका असेल किंवा हरभजन आणि गीता बसरा यांच्या नात्यांनी चांगल्याच चर्चा रंगवल्या होत्या, खास म्हणजे यांचे हे नाते पूर्ण झाले. अश्या अनेक खेळाडूंच्या आणि अभिनेत्रींच्या नात्याच्या चर्चा सुरूच आहेत. त्यामध्ये सर्वात पुढे आहे, के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या नात्याची चर्चा.

अथिया आणि राहुल या दोघांना खूप वेळा सोबत बघितले गेले आहे. कधी शॉपिंग करताना तर कधी कुठे कॉफी पिताना, कधी सोबत डिनर करताना तर कधी असेच सोबत वेळ घालवताना या दोघांना खूप वेळा पहिले आहे. ते दोघे एकमेकांसोबतचे काही फोटोज देखील शेअर करतात.

त्यामुळे त्यांचे नाते कदाचित मैत्रीच्या थोडे पुढेचा असावे असा कयास सगळीकडून लावण्यात येत होता. अगदी उघडपणे एकमेकांचे फोटो शेअर करणे, किंवा त्यावर छान कमेंट करणे या सर्व बाबींमुळे त्यांच्या नात्याचा अंदाज सर्वांनीच लावला होता. मात्र आता याच सुंदर नात्याला तडा गेला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

अथिया आणि राहुल या दोघांच्या नात्यामध्ये, फूट पडली आहे का असा प्रश्न आता पडला आहे. त्याचे कारण आहे, पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री सोनम बजावच्या फोटोवर राहुलने केलेली कमेंट. ‘सूर्य मावळत आहे आणि मी तुझ्या बद्दल विचार करत आहे,’ अशी एक इंस्टाग्राम पोस्ट सोनमने केली होती. त्यावर ‘फक्त एक कॉल च्या अंतरावर आहे’ असे राहुलने उत्तर दिले.

त्यामुळे नक्की राहुल आणि अथियाचे नाते संपले का? आणि सोनम सोबत राहुलचे नाते आहे का ? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यानी विचारले आहेत. मात्र अद्याप यावर, राहुल, अथिया किंवा सोनम पैकी कोणीच काही बोलले नाही.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.