‘या’ अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींना केला सवाल, ‘ता’लिबा’नी भावांना मला राखी बांधायची आहे, पण तुम्ही….’

‘या’ अभिनेत्रीने पंतप्रधान मोदींना केला सवाल, ‘ता’लिबा’नी भावांना मला राखी बांधायची आहे, पण तुम्ही….’

उद्या राखी पौर्णिमा आहे. आपल्या देशात सगळीकडेच भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण उत्साहात साजरा केला जातो. आपल्या देशात या सणाचे वेगळे आणि खास महत्व आहे. अनेक मोठाले शत्रुत्व एका राखीने मिटल्याची आपल्या देशाचा जुना इतिहास आहे.

राखी बांधून मनाचे नाते जोडण्याची आपल्या हिंदू धर्माची परंपरा आहे. सध्या सगळीकडे ता’लिबा’न आणि अ’फगा’णिस्तान मधील परिस्थतीने सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. अनेक हृ’दयद्रा’वक फोटोज आणि व्हिडियोज सर्वांच्या समोर येत आहेत. त्यामुळे काळीज पिळवटून जात असलं, तरीही आपण हतबल असल्याची भावना जास्त वेदनादायक आहे.

ता’लिबा’नने अ’फगा’णिस्तानचा ता’बा घेतला आणि तेथील नागरिकांनी आपला जी’व हातात घेऊन तेथून पळ काढण्यास सुरुवात केली. तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत असलेले बघायला मिळत आहे. खास करुन महिलांचे हाल, हृद’याचा ठोकाच चुकवत आहेत. आपले प्रा’ण वाच’वण्यासाठी या महिलांना, बुरखा घालणे अनिवार्य आहे.

त्यांचे सर्व स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आले आहे. आजवर ज्या महिला समर्थपणे तेथील कार्यालयात काम करत होत्या, त्यांना केवळ महिला आहे म्हणून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ज्या मुली शिक्षण घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा बाळगून होत्या त्यांचे शिक्षण बंद करण्यात आले. पार्लर, मॉल्स, हॉटेल्स इ ठिकाणी जिथे जिथे महिलांचे फोटोज जाहिरातीसाठी लावण्यात आले होते ते फाडून टाकले आहेत, किंवा त्यांना काळे फासले आहे.

या सर्व प्रकारांमध्ये, तेथील महिलांचे आयुष्य देखील धो’क्यात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यावरील अभिनेत्री माहिका शर्माने अजबच मागणी थेट पंतप्रधान मोदींकडे केली आहे. तिने तेथील परिस्थतीवर चिंता व्यक्त करत एक ट्विट केले आहे. मर्दानी सिनेमामध्ये काम करणाऱ्या माहिकाला अनेक जाहिराती आणि मालिकांध्ये तुम्ही पहिलेच असेल.

एफआयआर, रामायण, तू मेरे अगल बगल है या मालिकांमध्ये देखील ती झळकली होती. माहिका शर्माने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘मी अफगाणी महिलांना वाचण्यासाठी तिकडे जात आहे. तिकडे जाऊन मी रक्षाबंधनाला सर्व ता’लिबा’न्यांना राखी बांधून माझे भाऊ बनवेन. त्यानंतर राखीचे बहीण म्हणून राखीचे गिफ्ट घेताना, मी त्यांना महिलांचा आदर करण्यास शिकवेन.

त्यांना आई, बहीण किंवा मुली नसल्यामुळे ते असे गु’न्हे करत आहेत. मोदीजी कशी वाटली माझी आयडीया? मला अशा व्यक्तीची गरज आहे जो माझी राखी ता’लिबा’न्यांपर्यंत पोहोचवेल. मी कुरिअरने राखी पाठवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला नकार दिला. याबद्दल मोदीजी तुम्ही माझी काही मदत करू शकता का?’ तिने केलेल्या या ट्विटची काही जण खिल्ली उडवत आहेत, तर काहींनी तिच्या भावनांचा आदर केला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *