‘यामी गौतमने’ लॉकडाऊन असूनही एकदम सिक्रेट पद्धतीने गुपचूप उरकून घेतलं लग्न.. पहा तिचा पती आहे …

बॉलीवूड मध्ये डायरेक्टर आणि अभिनेत्री यांच्या प्रेमकथेचा जुनी परंपरा च आहे अस बोललं तर चुकीचं ठरणार नाही. अनेक वेळा डायरेक्टर सिनेमा बनवताना एक सुंदर अशी कल्पना देऊन अभिनेत्रींचे पात्र रंगवतात, ते त्यांच्या डोक्यात असते आणि अगदी तसेच पात्र वास्तवात देखील सिनेमाच्या माध्यमातून उतरवतात.
आपल्या डोक्यात रंगवलेलं ते पात्र आणि तशी सुंदरी जेव्हा ते शोधत असतात तेव्हा नकळत ते त्यांच्या प्रेमात पडतात. आपण असे अनेक किस्से पहिले आहेत. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे प्रेम देखील असेच आहे. बोनी कपूर एक निर्माता आणि दिग्दर्शक होता आणि त्याने श्रीदेवी सोबत अनेक सिनेमा केले. बोनी कपूर अनेक वेळा आपल्या मुलाखतीमध्ये सांगतात की, ते सिनेमा मध्ये काम करत असतानाच श्रीदवीच्या प्रेमात पडले होते.
त्यावेळी आपण विवाहित आहे किंवा आपल्याला दोन मुलं आहेत याबद्दलचा विचारच मनात नाही आला. कारण मी जशी कल्पना रंगवली होती तशी सुंदर मूर्ती म्हणून श्रीदेवी माझ्या समोर होती म्हणून मी तिच्या प्रेमात पडण्यापासून स्वतःला सावरू नाही शकलो. तसेच काही गोल्डी बेहल देखील सोनाली बेंद्रे च्या बाबतीत सांगतात. सोनाली ला आपल्या सिनेमामध्ये काम करत असतानाच मी तिच्या प्रेमात पडलो आणि आम्ही लवकरच लग्न केले असे डायरेक्टर गोल्डी बेहल सांगतात.
नुकतीच अशीच एक छुपी लोव्हस्टोरी पूर्ण होऊन सगळ्यांच्या समोर आली आहे. यामी गौतम आणि आदित्य धार या दोघानी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वरुन आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. उरी द सर्जिकल स्ट्राईक या सुपरहिट सिनेमाने आपल्या डायरेक्शन चा श्रीगणेशा करणारा आदित्य धार याने आपल्याच सिनेमाच्या अभिनेत्री सोबत म्हणजेच गौतमी सोबत लग्न केले.
ते दोघे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते असे बोलण्यात येत आहे. ‘तुझ्या मनाच्या प्रकाशामध्ये मला प्रेम करायला शिकवले. आपल्या कुटुंबियांच्या आशीर्वादाने आज आम्ही लग्न केलं आहे. कोरोना काळामुळे हे लग्न अगदी मोजक्याच आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत केले आहे.’ अशी पोस्ट या नव्या जोडप्याने टाकत आपल्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.
यामी गौतम हिने लग्नासाठी अगदी खास अश्या लूकची निवड केली. सुंदर अशी डिझायनर रेड-मरुन रंगाची साडी आणि त्यावर सोन्याचे दागिने घातलेले आहेत आणि त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहेत.तर आदित्य ने क्रीम रंगाची शेरवानी आणि फेटा बांधला आले. त्यामध्ये अगदी रुबाबदार असा त्याचा लूक आहे. दोघांचे खळखळून हसणारा फोटो एकमेकांच्या प्रेमाची साक्ष आहे.
असे सांगितले जात आहे की, उरी सिनेमाच्या वेळीच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यामी गौतम हिने प्रथम टेलिव्हिजन मधून आपल्या अक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने आपला मोर्चा साऊथ च्या सिनेमांकडे वळवला. तिथेही तिने काही सिनेमा केले आणि त्यात तिला यश देखील मिळाले. त्यातच बॉलीवूडमध्ये विकी डोनर या सिनेमामधून तिने पदार्पण केले आणि काहीच वेळात तिचा बॉलीवूड मधेही वेगळा चाहतावर्ग तैयार झाला.
काबील, सनम रे अशा अनेक सिनेमामध्ये तिने आपल्या अभिनयाची छटा उमटवली होती. आदित्यने देखील आधी अनेक सिनेमा साठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. मात्र त्याला उरी या सिनेमाने नवी ओळख मिळवून दिली. यामी आणि आदित्यच्या फोटोवर चाहत्यांनी आपल्या प्रेमाचा वर्षाव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.