‘मुलगी झाली हो’ मालिकेत नवीन ट्विस्ट; बिग बॉसमध्ये धुमाकूळ घालणारी ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री..

मनोरंजन
हिंदी असेल किंवा मराठी जवळपास प्रत्येक महिन्यात, एक नवीन मालिका सुरू होते. मात्र प्रत्येक मालिका लोकप्रिय ठरते असे नाही. यापैकी काहीच मालिकांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते. ज्यामालिका वेगळ्या आणि हटके विषयावर आधारित आहेत, आजकाल त्याच मालिकांना जास्त यश मिळत आहे.
नेहमीच्या सासु-सुनांच्या भांडणावर आधारित मालिकांपेक्षा, वेगळ्या विषयावर आधारित अशा मालिका आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामध्ये आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, सहकुटुंब सहपरिवार, स्वाभिमान यासारख्या अनेक मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहेत. यामध्ये आई कुठे काय करते ही मालिका, सध्या टीआरपीच्या शिखरावरती आहे.
मात्र त्यासोबत अजून एक मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो, या मालिकेने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. सुरुवातीपासूनच या मालिकेचा टीआरपी चांगलाच होता. मालिका सुरू झाली तेव्हापासूनच मालिकेची लोकप्रियता वाढतच राहिली. या मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहेत.
उत्कृष्ट कथानक आणि तेवढ्याच उमदा कलाकारांची फौज यामुळे, या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सध्या या कथानकाला अतिशय रंगतदार वळण आलेल बघायला मिळत आहे. आणि आता या अतिशय रंजक वळणावर एका दमदार पात्राची या मालिकेत एंट्री होत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अभिनेत्री ‘शर्मिष्ठा राऊत’ आता मुलगी झाली हो या मालिकेत झळकणार आहे. अतिशय विलक्षण अशा वळणावर शर्मिष्ठाची एन्ट्री या मालिकेत होत आहे. शर्मिष्ठा या मालिकेमध्ये नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आणि निलिमाच्या येण्याने मालिकेत नक्कीच एक वेगळं नवीन वळण येणार आहे.
सिद्धांत सोबत लग्न करण्यासाठी माऊने नकार दिला आहे, आणि लग्न करेल तर शौनकशी असं अगदी ठामपणे देखील सांगितले आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी, सिद्धांत हार मानायला तयार नाही. नीलिमाचा वापर करून तो माऊचे वडील अर्थात विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणार आहे.
सिद्धांत आणि निलीमाचा हा डाव यशस्वी होणार का, हे आता मालिकेच्या पुढील भागामधूनच उलगडेल. मात्र नीलिमा सामंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा एक नवा आणि हटके अंदाज रसिकांना बघायला मिळेल. मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशीमगाठी, कुम्पण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकेत शर्मिष्ठाने काम केले आहे.
दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यासारख्या सुपरहिट मराठी सिनेमांमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली आहे. त्याचबरोबर बिग बॉस मराठी या रियालिटी शोमध्ये देखील शर्मिष्ठा झळकली होती. बिग बॉस मराठी मधून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतरच शर्मिष्ठा, तेजस देसाई सोबत लग्नबंधनात अडकली.
सोशल मीडियावरती ती कमालीची सक्रिय असते. नेहमीच व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांच्या, शर्मिष्ठा संपर्कात असते. आपल्या नवऱ्यासोबत म्हणजेच तेजस सोबतचे, खास फोटो शेअर करत ती सर्वांना कपल गोल देखील देत असते. तिच्या प्रत्येक फोटो वर चाहते भरभरून लाईक आणि कमेंट करत असल्याचे बघायला मिळते. त्यावरूनच तिच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकतो. आता पुन्हा एकदा शर्मिष्ठा मालिकेत झळकणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता बघायला मिळत आहे.