मिलिंद गुणाजी यांच्या मुलाला पाहिलंत का ? दिसतो अतिशय हॅंडसम, दिग्दर्शक म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये करतोय काम..

मनोरंजन
आपल्या राज्यामध्ये अनेक, प्रतिभावान आणि उमदा कलाकार आहेत. बॉलीवूडमध्ये देखील, अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अशा अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विक्रम गोखले, सचिन खेडेकर, अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी, राधिका आपटे, सयाजी शिंदे, श्रेयस तळपदे, उपेंद्र लिमये, सई ताम्हणकर, अशा अनेक कळकरांनी, बॉलीवूडमध्ये आपली खास आणि हटके ओळख निर्माण केली आहे.
अनेक मोठाले दिगदर्शक, मराठी कलाकारांसोबत काम करणे पसंत करतात. संजय लीला भन्साळी यांच्या अनेक सिनेमामध्ये मराठी कलाकार आपल्याला बघायला मिळतात. मधल्या काळात ऐश्वर्या आणि शाहरुख खान सोबत आलेला सिनेमा ‘देवदास’मध्ये देखील अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली होती. त्यावेळी त्यांचे पात्र चांगलेच लोकप्रिय देखील झाले होते.
खास करुन एका कलाकाराने तर, आपल्या छोट्याशा रोलमध्ये अनेकांची मने जिंकली होती. तो कलाकार म्हणजेच मिलिंद गुणाजी. ऐश्वर्याच्या जावायचा रोल करत त्यामध्ये त्याने, खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र अनेकांना त्याचे काम खूप जास्त आवडले होते. मिलिंद गुणाजी यांनी नेहमीच वेगळ्या आणि हटके भूमिका साकारल्या आहेत.
भटकंती या मालिकेमधून ते घराघरात पोहोचले. आपल्या महाराष्टातील किल्ले, पुरातन वस्तू, मंदिर यांचा परिचय या मालिकेमधून सर्वाना झाला. आजही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. मिलिंद गुणाजी यांनी अनेक मराठी, हिंदी आणि साऊथ सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित, लोकप्रिय मालिका ‘वीर शिवाजी’मध्ये त्यांनी शूर शहाजीराजेंची भूमिका साकारली होती.
त्या पत्रामधील अभिनयाने त्यांनी सर्वानाच स्तब्ध केले होते. मिलिंद गुणाजी सुरुवातीपासून, प्रकाशझोतात येणे टाळतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांना फारस काही माहित नाहीये. मिलिंद आणि सूत्रसंचालिका राणी गुणाजी यादोघांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव अभिषेक आहे. अभिषेक आपल्या वडिलांप्रमाणेच भारदस्त आणि कमालीचा हँडसम आहे.
पॉलिटिक्स राज ठाकरे यांच्या मुलाचा अर्थात अमित ठाकरेंचा तो अगदी जवळचा मित्र आहे. अनेकवेळा, अमित ठाकरे आणि अभिषेकला सोबत बघितले जाते. अमितच्या लग्ना, अभिषेक गुणाजी अगदी थाटात सगळीकडे मिरवत होता; आणि तेव्हापासूनच त्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. भारदस्त व्यक्तित्व, उंचपुरा मजबूत बांधा आणि दिसायला हँडसम, म्हणून अभिषेक देखील अभिनय क्षेत्रात प्रवेश करेल असच सर्वाना वाटत होत.
मात्र त्यानं दिग्दर्शक बनायचं निर्णय घेतला असून, तो त्यादृष्टीने काम करत आहे. मुंबईमधील रामनारायण रुईया कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. प्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन आणि मिलिंद गुणाजी यांच्या सोबत त्याने मध्यंतरी ‘छल’ या सिनेमाचे दिग्दर्शन देखील केले होते. आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये त्याने चांगलेच कौतुक मिळवले.
त्यानंतर, आमदार रोहित पवार यांच्या ‘आपलं कर्जत जामखेड’या सीरिजचं दिग्दर्शन देखील अभिषेकनेच केलं. या सिरीजला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच, सोनाली कुलकर्णी सोबत त्याने टीव्हीसी पाइप्सच्या जाहिरातीच देखील दिग्दर्शन केलं. मात्र एकंदरीत त्याचे काम बघता, सिनेसृष्टीला एक उत्कृष्ट दिग्दर्शक भेटणार असल्याचं म्हणायला हरकत नाही.