मित्र असावा तर असा ! प्रवीण तरडे यांनी मित्राच्या मदतीसाठी जे केलं ते बघून तुम्हालाही वाटेल कौतूक ! पहा Video

मनोरंजन
मैत्री मैत्रीचे नाते हे कोणालाही समजण्याच्या पलिकडचे असते. समजलं तर सगळं काही असते, आणि नाही समजलं तर काहीच नसते. मात्र वेळप्रसंगी जो कामाला येतो तोच खरा मित्र आणि तीच खरी मैत्री. हे आपण वेगवेगळ्या उदाहरणात, आपण अनेक वेळा पाहिले देखील आहे. एक मित्र आपल्या खऱ्या मित्रासाठी काहीही करू शकतो.
संपूर्ण जगाशी जगू लढू शकतो, असेच काही मैत्रीची परिभाषा आपल्याला सांगितली जाते. परंतु खरे बघता मैत्रीची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. मैत्री एक, निस्वार्थ नाते असते. यामध्ये कोणत्याही प्रकारची अट नसते. आणि अशीच निस्वार्थ मैत्री कायम टिकून राहते. त्यामुळे, या जगात अनेकांनी मैत्रीचे वेगवेगळे उदाहरण प्रस्थापित केले आहेत.
सध्या एका मराठमोळ्या कलाकाराने, आपल्या मित्रा सोबत जे काही केले त्याचा व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. मैत्रीची खरी परिभाषा सांगणारा हा व्हिडिओ प्रवीण तरडे यांचा आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक उत्तम आणि दिग्गज कलाकार म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखले जाते. अजिंक्य या मराठी सिनेमा मधून त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक ओळख मिळाली.
त्यानंतर फॅन्ड्री आणि रेगे सारख्या सिनेमात त्यांनी काम केले. देऊळ बंद आणि मुळशी पॅटर्न या सिनेमाचे दिग्दर्शन देखील प्रवीण तरडे यांनी केले. त्यांच्या या दोन्ही सिनेमांना उत्तम प्रतिसाद मिळाला. फर्जंद ,ट्रिपल सीट, वेडिंगचा सिनेमा यासारख्या सिनेमांमध्ये देखील ते झळकले होते. त्यांचा सेनापती हंबीरराव मोहिते सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्रवीण तरडे केवळ आपल्या करिअर साठीच नाही तर, स्वतःच्या वैयक्तिक गोष्टींसाठी देखील चर्चेमध्ये असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून प्रवीण तरडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते आपला मित्र पिट्या याला त्याच्या कामात थोडासा हातभार लावताना बघायला मिळत आहेत. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.
त्यामुळे मातीच्या कुंड्या लहान मडकी यांना चांगलीच मागणी आहे. या सर्वांचा वापर किल्ले बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे दिवाळी सणाच्या वेळी या सर्वांची चांगलीच मागणी असते. प्रवीण तरडे यांचा मित्र पिट्या याचा देखील हाच पारंपारिक आणि मूळ व्यवसाय आहे. आपली परंपरा आणि व्यवसाय जपलेच पाहिजे, असे म्हणत तरडे यांनी आपला मित्र कशाप्रकारे दरवेळी नातेवाईक आणि कुटुंबाला परंपरागत व्यवसायात मदत करण्यासाठी येतो, हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे स्वतः त्यांच्या त्यांच्या मित्रासोबत मडक्यांना रंग देताना बघायला मिळत आहेत .आपली परंपरा जपण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे आणि त्यासाठी जे कुणी ही परंपरा जपतात त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य देखील आहे ,असा मोलाचा संदेश प्रवीण तरडे यांनी आपल्या व्हिडिओ मधून दिला आहे.
मित्राच्या व्यवसायात हातभार लावत असताना प्रवीण तरडे यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि समाधान बघायला मिळाले. मैत्रीचे नाते हे खरोखर सर्व सीमांच्या पलिकडचे असते,हे प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.