“माझी तुझी रेशीमगाठ” मधील ‘हा’ प्रसिद्ध कलाकार आहे मुंबईतील बेस्ट सेवेचा कर्मचारी, जाणून घ्या..

मनोरंजन
झी मराठीवर सध्या “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये आपला श्रेयस तळपदे प्रार्थना बेहेरे यांच्या प्रमुख भूमिका दिसत आहेत. या प्रमाणे यामध्ये एका बालकलाकाराची भूमिका सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. ती म्हणजे मायरा वायकुळ हिची. मायरा हिने मालिकेमध्ये परी ही छोट्या मुलीची भूमिका साकारली आहे.
या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे याने अनेक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. श्रेयस तळपदे याने या मालिकेमध्ये यश नावाची ही भूमिका साकारली आहे. तर प्रार्थना बेहेरे हिने नेहा हे पात्र साकारले आहे. या मालिकेमध्ये आपल्याला संकर्षण कराडे हादेखील दिसत आहेत. संकर्षण कराडे हा या मालिकेतून काही दिवस ब्रेक घेणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती.
त्याच्या नाटकाचे प्रयोग आता सुरू होणार आहेत. त्यामुळे तो मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे सांगण्यात येते. या मालिकेमध्ये इतर भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. यामध्ये, घारतोंडे ही भूमिका ही प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तर या मालिकेमध्ये सिमी चौधरी हिने नकारात्मक भूमिका साकारली आहे. सीम्मी चौधरी हिला घारतोंडे हा नेहमीच कंपनीच्या अफरातफर कामामध्ये मदत करत असतो.
त्यामुळे तो तिची नेहमीच बाजू घेत असतो. या मालिकेचे कथानक आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे मालिकेमध्ये आता येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला मजेशीर प्रसंग पाहण्यास मिळणार आहेत. मालिकेमध्ये घारतोंडे ही भूमिका दिनेश कानडे यांनी साकारली आहे. दिनेश कानडे यांनी या आधी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.
आज आम्ही आपल्याला दिनेश कानडे यांच्या बद्दल माहिती देणार आहोत. दिनेश कानडे यांनी मुंबईतील उत्कर्ष मंदिर मालाड येथील शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर अभिनयाची आवड असल्याने ते लहानपणापासूनच वेगवेगळे नाटक आणि प्रयोग करायचे. त्यांनी त्यांचं पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले आहे. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना अभिनयाची आवड देखील लागली.
त्यामुळे त्यांनी मालिका आणि चित्रपटात देखील काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र, अत्यल्प मानधन मिळत असल्यामुळे त्यांनी रोजगाराची दुसरी संधी देखील शोधली. रंगकर्मी या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. चाणक्य या नाटकातही ते महत्वाच्या भूमिकेत दिसले होते. चाणक्य हे हिंदी नाटक दिल्लीतील संसद भवनात देखील सादर करण्यात आले होते.
त्यावेळी देखील त्यांचे खूप कौतुक करण्यात आले होते. माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये दिनेश कानडे यांनी नकारात्मक भूमिका साकारली असली तरी त्यांच्या भूमिकेचे सगळ्यांनीच कौतुक केले आहे. घारतोंडे ही भूमिका सादर करताना अनेक आव्हाने आपल्यासमोर होती, असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी देखील कानडे यांनी साईबाबांच्या जीवनावरील आधारित मालिकेत काम केले होते. त्याच बरोबर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्यांनी केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी राहुजी सोमनाथ ही व्यक्तिरेखा साकारली होती.
या भूमिकेमुळे दिनेश कानडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. आजवर दिनेश कानडे यांच्या बाबत एक गोष्ट अनेकांना माहीत नाही. दिनेश कानडे हे मुंबईतील परिवहन सेवा असलेल्या बेस्ट मध्ये कर्मचारी आहेत. नाटक आणि अभिनय सांभाळून ते बेस्टमध्ये नोकरी देखील करत असतात. त्यामुळे त्यांच्या या दुहेरी भूमिकेचे अनेकांना कौतुक वाटते. बेस्ट मधील नोकरी त्यांची जिवाभावाची असल्याचे सांगण्यात येते.