‘माझा होशील ना’ फेम बंधू मामाच्या मुलाला पाहिलं का? आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, दिसतो अतिशय हँडसम..

‘माझा होशील ना’ फेम बंधू मामाच्या मुलाला पाहिलं का? आहे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, दिसतो अतिशय हँडसम..

सध्या मराठी मालिकांनी सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगवली आहे. हिंदी मालिकांहून आधीकी जास्त आता मराठी मालिकांचा टीआर पी आहे. अनेक मराठी मालिकांनी प्रसिद्धीची शिखर गाठली आहे. देवमाणूस, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे काय असतं, राजा राणीची जोडी, अश्या मालिकांनी लोकप्रियतेचे नवीन विक्रम बनवले आहे.

अनेक मालिकांनी लोकप्रियतेचे नवीन विक्रम बनवले आहेत सध्या सुख म्हणजे काय असतं आणि रंग माझा वेगळा हे टीआरपीच्या उच्चांकावर आहेत. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी आलेली मालिका माझा होशील ना देखील सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे.

अल्पावधीतच या मालिकेने मला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे या मालिकेतील आदित्य आणि सहीची हटके लव स्टोरी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे. सोबतच या मालिकेमध्ये मामा आणि भाच्याच्या स्पेशल नात्याचा उलगडा काही खास पद्धतीने केला केला आहे. त्यामुळे या मालिकेने चाहत्यांना चांगलीच पसंती मिळवली आहे.

मालिकेतील आदित्य आणि सई ची भूमिका साकारणाऱ्या विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे ची जोडी घराघरात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. भन्नाट लव स्टोरी आणि मामाचा असणारे सॉलिड कॉम्बिनेशन अशी नवीन वेगळी कल्पना रंगणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकून घेतली आहे.

त्यापैकच एक आहे बंधू मामा हे कॅरेक्टर. ज्येष्ठ मराठी अभिनेते सुनील तावडे यांनी ही भूमिका साकारली आहे. सुनील तावडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

मागील कित्येक दशकांपासून ते मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहेत. बऱ्याच मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलेले आहे. जबरदस्त,मलाल, शोध, मेमरी कार्ड, आयपीएल,या सिनेमामध्ये सुनील तावडे यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. फू बाई फू या रियालिटी कॉमेडी शो मध्ये त्यांनी ही त्यांनी काम केले आहे त्यांच्या खास हटके अशा विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवले आहे.

सुनील तावडे यांचा मुलगा देखील अभिनेता आहे. शुभंकर तावडे याने झी युवा वाहिनी वरील फ्रेशर्स मालिकेतून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. डबल सीट या चित्रपटातून त्याने अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात केली असली तरीही कागर चित्रपटात त्याच्या अभिनयाची खास कौतुक केले गेले.

कागर चित्रपटातून त्याला एक वेगळी ओळख मिळाली. शुभंकर तावडे यांनी काळे धंदे या वेब सीरीज मध्ये देखील काम केले आहे. त्याने मुंबईच्या ड्रॅमा स्कुलमधून अभिनयाचे कोर्स पूर्ण केले आहे. कॉलेजमध्ये असताना अनेक हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये देखील त्याने काम केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.