‘माझा होशिल ना’मधील ‘पिंट्या मामा’ची पत्नी देखील आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री; दोघांनी ‘OMG गॉड’ चित्रपटात केलंय काम..

सध्या सगळीकडेच मराठी मालिकांची धूम बघायला मिळत आहे. अनेक मराठी मालिका लोकप्रियतेचे शिखरं गाठत आहे. त्यामुळेच अनेक प्रसिद्ध आणि हिट ठरलेल्या मराठी मालिका आता हिंदी आणि इतर भाषेमध्ये देखील बनत आहेत. काही मराठी मालिका अगदी हटके अश्या कथानकावर आधारित असल्यामुळे जबदस्त लोकप्रिय झाल्या आहेत.
देवमाणूस, रात्रीस खेळ चाले, या वेगळ्या विषयावर आधारित अशा मालिकांनी चाहत्यांच्या मनात आपली वेगळी आणि खास जागा निर्माण केली आहे. अश्याच थोड्या हटके विषयावर आधारित अजून एक मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेने अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग कमवला आहे.
अलगद उमलत जाणारी प्रेमकथा आणि सोबतीला मामा-भाच्याचे मैत्रीपूर्ण नाते यावर आधारित ही मालिका सध्या खूपच रोमांचक वळणावर आहे. मामा-भाच्याचे नाते हे नेहमीच खूप खास असते. आपल्या भाच्याच्या प्रेमकहाणीला पूर्ण करण्यासाठी, मामा कसं अगदी काहीही करायला तैयार होतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची साथ सोडत नाही अशी सुंदर कथा या मालिकेत दाखवली आहे.
म्हणून सई आणि आदित्यासोबतच मामाचे पात्र देखील प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. पिंट्या मामाच्या पात्राला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले आहे, असं म्हणलं तरीही वावगं ठरणार नाही. या पिंट्या मामाला तुम्ही अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये पाहिलंच असेल. मूळचा पुण्याचा असणारा, निखिल रत्नपारखी पिंट्या मामाची भूमिका साकारत आहे.
त्याने अनेक हिंदी सिनेमामध्ये काम केल आहे. सलमान खानच्या ओह माय गॉड या सिनेमामध्ये त्याची खास भूमिका होती. हटके अशी विनोदी शैली आणि अगदी उत्कृष्ट कॉमेडी टायमिंगमुळे त्याने बॉलीवूडमध्ये आपले नावं कमवले. त्याच्या कॉमेडी टायमिंगचे अनेक दिग्दर्शक आणि अनेक दिग्गज कलाकार कौतुक करत असतात.
त्याने अक्षय कुमार, परेश रावल सारख्या दिग्गज कलाकरांसोबत देखील काम केल आहे. निखिलची पत्नी भक्ती देखील, चित्तरपटसृष्टीमधलं मोठं नाव आहे. तिने अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अग्गबाई सासूबाई या मालिकेत सध्या भक्ती रत्नपारखी काम करत आहेत. कॉमेडीची बुलेट ट्रेन या मराठी कॉमेडी रियालिटी शोमधून ती घराघरात पोहोचली.
तिचा देखील भलामोठा चाहतावर्ग आहे. तू अशी जावळी राहा या लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये देखील तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. निखिल आणि भक्ती अनेकवेळा आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत आपले फोटोज चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.
निखिल सध्या मराठी मालिकेत काम करत आहे, आपल्या भन्नाट अश्या विनोदीशैलीमुळ त्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.अनेक हिंदी वेब-सिरीज मध्ये देखील त्याने काम केलं आहे. नारबाची वाडी, व्हेंटिलेटर यासारख्या मराठी चित्रपटात देखील निखिलने काम केलं आहे.