महाभारतातील श्रीकृष्ण नितीश भारद्वाज यांची पत्नी आहे पोलीस दलात मोठी अधिकारी, पहा फोटो…

महाभारतातील श्रीकृष्ण नितीश भारद्वाज यांची पत्नी आहे पोलीस दलात मोठी अधिकारी, पहा फोटो…

1990 च्या दशकामध्ये छोटा पडदा म्हणजेच टीव्ही कात टाकत होता. त्यावेळेस नव नवीन मालिका छोट्या पडद्यावर येत होत्या. अशाच वेळी दूरदर्शन देखील बहारात आले होते. त्यावेळेस आजच्या सारख्या अनेक अशा वाहिन्या नव्हत्या. मात्र, दूरदर्शन वरील कार्यक्रम प्रेक्षकांना खूप भावत होते.

‘वागळे की दुनिया’, ‘तेनाली रामा’ यासारख्या मालिका प्रेक्षकांना खूप भावत. त्यामध्येच मग रामानंद सागर यांची महाभारत ही मालिका आली होती. या मालिकेमध्ये आपल्याला कृष्णाच्या भूमिकेने सर्वांनाच मोहून टाकले होते. कृष्णाची भूमिका यामध्ये नितीश भारद्वाज यांनी केलेली होती. ही भूमिका अतिशय अजरामर अशी झाली.

या आधी नितीश भारद्वाज यांनी बॉलीवूड मध्ये येण्यासाठी खूप कष्ट केले होते. त्यानंतर त्यांना महाभारत ही मालिका मिळाली होती. महाभारतात देखील त्यांना सुरुवातीला विदुराची भूमिका मिळाली होती. मात्र, नितीश भारद्वाज यांच्या हातातून ही भूमिका निसटली. त्यानंतर त्यांना नकुल व सहदेवची भूमिका करण्यासाठी देखील विचारण्यात आले होते.

मात्र, ही भूमिकाही त्यांना मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. कृष्णाची भूमिका त्यांनी एवढी चांगली केली की, ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. कृष्ण म्हटले की, आपल्यासमोर आजही नितीश भारद्वाज हेच उभे राहतात. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला अजरामर पात्र असेच बिरुद मिळाले आहे.

नितीश भारद्वाज यांनी त्यानंतर काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यांना फारसे यश मिळाले नाही. गेल्या वर्षी त्यांनी वेब सिरीज मध्ये देखील पदार्पण केले होते. मराठी वेबसीरिज समांतरमध्ये त्यांनी काम केले होते. या वेळी सीरिजमध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित दिसली होती.

या वेब सिरीज मध्ये तेजस्विनी पंडित आणि स्वप्निल जोशी यांचा एक जोरदार असा लीप लॉक सिन देखील होता. त्यामुळे देखील याची खूप मोठी चर्चा झाली होती. नितीश भारद्वाज यांचे दोन लग्न झालेले आहेत. हे फार कमी लोकांना माहीत असेल. त्यांचे पहिले लग्न 1991 मध्ये मोनिषा पटेल यांच्यासोबत झाले होते. या दोघांना दोन मुले देखील आहेत.

 

मात्र, काही वर्षाच्या अंतरानंतर या दोघांमध्ये घ’टस्फो’ट झाला होता. त्यानंतर 2008 मध्ये नितीश यांनी स्मिता यांच्याशी लग्न केले. या दोघांना देखील दोन जुळ्या मुली आहेत. त्यांची दुसरी पत्नी स्मिता या आयएएस ऑफिसर आहेत. तसेच त्यांचा प्रशासनामध्ये खूप दबदबा असल्याचे देखील सांगण्यात येते. याआधी नितीश यांनी काही काळ राजकारणामध्ये देखील प्रवेश करून पाहिला होता. मात्र, 58 वर्षीय या अभिनेत्याला यामध्ये यश मिळाले नव्हते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *