“मला नवऱ्याकडे जायचंय” अस म्हणत आईजवळ ढसाढसा रडू लागली ‘ही’ चिमुकली, पहा व्हायरल व्हिडिओ…

“मला नवऱ्याकडे जायचंय” अस म्हणत आईजवळ ढसाढसा रडू लागली ‘ही’ चिमुकली, पहा व्हायरल व्हिडिओ…

आई मला खेळायला जायचंय जाऊ दे न व…नदीमध्ये पोहायला जायचंय जाऊ दे न व… माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे न व… मी तुझं सगळं काम ऐकतो जाऊ दे न व…हे म्हणण्याचे वय असताना सध्या सोशल मीडीयावर एका चिमुकलीचा व्हिडीओ वा’यरल होत आहे आणि यामध्ये ती चक्क मला माझ्या नवऱ्याकडे जायचे आहे असे म्हणतं आहे.

आपल्याला माहित आहे कि लहान मुलं नेहमीच कोणत्या ना कोणच्या कारणांसाठी आपल्या पालकांकडे हट्ट करत असतात. त्यांना मागितलेली वस्तू घेऊन दिली नाही तर ते काय काय करतात हे सांगण्याची गरज आपल्याला नाही आहे पण आता सोशल मीडीयावर सध्या एका चिमुकलीचा व्हिडीओ तु’फान व्हा’यरल होत आहे.

ज्यामध्ये ही चिमुरडी खेळणं, खाऊ किंवा वस्तूसाठी नाही तर चक्क तिच्या नवऱ्यासाठी रडत आहे. आता तुम्ही विचार करत असाल नवरा म्हणजे काय? आणि तिच्या या वयात कुटला नवरा, हे या चिमुरडीला तर माहीत तरी आहे का? माझा नवरा कुठे आहे, मला नवऱ्याकडे जायचं आहे. असं ती रडत आईला सांगते आहे. आता या चिमुरडीच्या या क्युटनेसनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा लोट पोट होऊन हसू लागलं.

सोशल मीडीया युजर @vkvkmarwat ने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता कि एक मुलगी जमिनीवर निराश आणि उदासपणे बसली आहे, ती र’डताना देखील आपल्याला दिसत आहे. त्यावेळी तिला तिची आई याचं कारण विचारते.

तेव्हा ती आपल्याला नवऱ्याकडे जायचं असल्याचं सांगते. ती चिमुरडी म्हणते कि मला माझ्या नवऱ्याकडे जायचं आहे. तेव्हा तिची आई तिला विचारते कोण आहे तुझा नवरा तेव्हा ती चिमुरडी मामा असं म्हणते. तेव्हा तिची आई तिला मजेदार उत्तर देते आणि सांगते कि मामा तर मामीचा नवरा आहे. या व्हिडीओ मध्ये आपल्याला या माया लेकींची चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.

मुलीचा हा क्युटनेस आणि गोड चेहरा पाहून सोशल मीडिया युजर्सना सुद्धा हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना देखील ही मुलंसुद्धा ना… कोण समजावेल यांना असं कॅप्शन दिलं आहे. आता हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच मजेदार प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी लोकांनी हल्ली लहान मुलांना लवकर मोठं होण्याची घाई असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच अनेक विनोदी कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *