मराठी सिनेसृष्टीवर शोककळा ! ‘पाहिले न मी तुला’ मधील ‘या’ कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर, गमावली जवळची व्यक्ती..

मनोरंजन
आपले आयुष्य काय आहे, आणि ते कस कलाटणी घेईल याबद्दल आपण कधीच कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही. आणि कधी कधी आपण विचार देखील केला नसेल तस, भरगोस यश आपल्या पदरात येऊन पडते. असे अनेकांच्या बाबतीत घडले आहे, ज्यांनी कधीही विचार देखील केला नसेल, तस भरगोस यश मिळालं.
प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवण्याचे स्वप्न सर्वच बघतात. खास करून जेव्हा संबंधित व्यक्ती मनोरंजन विश्वातील असेल तर त्यांना, प्रसिद्धी आणि लोकप्रियता हवीच असते. पण प्रत्येक कलाकाराला ती लोकप्रियता मिळतेच असं नाही. आणि काही कलाकारांना अगदी अल्पवधीतच भसरगोस लोकप्रियता, प्रसिद्धी सर्व काही मिळते.
तन्वी मुंडले देखील अशाच काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहे. तन्वी मूळची, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची. कुडाळमधेच, तन्वीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्स ग्रुप तिने जॉईन केला आणि तिथूनच तिला अभिनयाची ओढ लागली. त्यानंतर आपल्या ओढ आणि इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने, तन्वीने पुण्यात ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले.
बऱ्याच नाटकांमध्ये तिने दमदार अभिनय करत रसिकांची मन जिंकली. रंगमंचावर तिच्या अभिनयाचे चांगेलच कौतुक झाले. त्यानंतर, तिने थेट ‘पहिले न मी तुला’ चे ऑडीशन दिले आणि त्यात तिची निवड देखील झाली. निरागस असा चेहरा, सतत चेहऱ्यावर स्मितहास्य यामुळे तन्वीने थोड्याच वेळात अनेकांची मन जिंकली. पहिले न मी तुला या मालिकेमध्ये, शशांक केतकर आणि अक्षय कुलकर्णी सारख्या अभिनेत्यासोबत तिने काम केले.
प्रेम माघून किंवा हिसकावून मिळत नाही, प्रेम हे होतंच असते, या कथानकावर आधारित, पहिले न मी तुला मालिकेला प्रेक्षकांची हवी तशी पसंती दिली नाही मात्र, तन्वीला प्रेक्षकांनी आपली पसंती दिली. याच सतत हसऱ्या राहणाऱ्या तन्वीवर सं’कटांचा आणि दुःखाचा डोंगर को’सळला आहे. तन्वीच्या वडिलांचे नि’धन झाले आहे.
सोशल मीडियावर, याबद्दलची एक पोस्ट शेअर करत ती चांगलीच भावुक झाली. ‘तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात जवळचा मित्र आहेस आणि हे माझं भाग्य आहे की मी तुझी मुलगी आहे. खूप प्रेम आबु’ असं आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टवर, एक फोटो शेअर करत तिने लिहले आहे. या फोटोमध्ये, तन्वी आपल्या वडिलांसोबत बघायला मिळत आहे.
‘माझी वेळ येईल तेव्हा आपण नक्की भेटू,’अशी भावना तिने आपल्या बाबांप्रति व्यक्त केली आहे. तिच्या या भावनिक पोस्टवर, मालिकेतील सहकालकरांनी आणि तिच्या चाहत्यांनी शोक व्यक्त करत तिच्या बाबांना, श्रद्धांजली वाहिली आहे. तन्वीच्या वडिलांचे निधन नक्की कोणत्या कारणामुळे झाले आहे, याबद्दलचा कोणताही खुलासा झालेला नाहीये. पण तिच्यावर ओढवलेल्या या दुःखामुळे, तिचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.