मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचे एका चित्रपटाचे मानधन बघून चकित व्हाल, स्वप्निल जोशी तर एका चित्रपटासाठी…..!

हिंदी चित्रपट सृष्टीप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टी मधून देखील असे काही कलाकार अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात मानधन मिळते. तसेच मराठी चित्रपट आणि मालिकेतील कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते.
या सेलिब्रेटीच्या लाईफबद्दल जाणून घेणाची इच्छा प्रत्येकालाच असते. आपण आज अशाच काही मराठीतील दिग्गज कलाकारांचे बद्दल जाणून घेणार आहोत की त्यांना त्यांच्या अभिनयाच्या मोबदल्यात किती मानधन मिळते.
1) सई ताम्हणकर:- सई अशी एक मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे की बॉलिवूडच्या अभिनेत्रींशी तिची बरोबरी होते. नेहमी आपल्या वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत रहाणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सईची गणना होते. अभिनयातील तिचा बि’नधास्तपणा सर्वांचंच लक्ष वेधुन घेत असतो.
अनेक चित्रपटामधून ती बो’ल्ड सीन देण्यास कधीच कचरली नाही. दुनियादारी’, मितवा, तसेच हिंदी सिनेमात पण अतिशय दमदार अभिनय करत सई यश मिळवण्यास सिद्ध झाली आहे. सई ताम्हणकर एका चित्रपटासाठी किती मानधन घेत असावी हा प्रश्न प्रत्येक चाहत्यांच्या मनात येतो. तर मिळालेल्या माहितीनुसार ती एक चित्रपटात अभिनयाचे वीस ला’ख रुप’ये मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
2) अंकुश चौधरी:- मराठीचा अमीर खान म्हनून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुशने आजवर खूप साऱ्या मराठी चित्रपटातून आपला अभिनय आणि त्यातील कौशल्य चाहत्यांना दाखवून दिलं आहे. ‘दुनियादारी’ चित्रपटातलं दिग्याची भूमिका सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि आजही आठवणीत आहे.
‘गुरु’, ‘ट्रिपल सीट’ आणि ‘दगळी चाळ’ अश्या बिग बजेट मूवी च्या प्रोडकशन हाऊसेसने सुद्धा अंकुश च्या कामाचे कौतुक केले. छोट्या पडद्यावर देखील अंकुश चौधरीने काही मराठी मालिका केल्या आहेत ज्या खूप गाजल्या. अंकुश चौधरी हा एका चित्रपटासाठी 30 ला’ख रु’पये मानधन घेत असल्याचे समजते.
3) सुबोध भावे:– मराठी सिनेसृष्टीत बादशहा समजला जाणारा अभिनेता म्हणजेच सुबोध भावे. सुबोध भावेने अनेक असे मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांमधून उत्कृष्ट असा अभिनय करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिका त्याची प्रचंड गाजलेली मालिका आहे.
सुबोधने ‘कट्यार का’ळजात घु’सली’ आणि ‘बालगंधर्व’ यात अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. इतका चांगला अभिनय करून देखील त्याचे अभिनयाचे मानधन ऐकून चकित व्हाल. अभिनयापोटी सुबोध भावे केवळ द’हा ला’ख रु’पये एक चित्रपटासाठी आकारत असल्याची माहिती समोर आली आहे.
4) अमृता खानविलकर:- एका मालिकेची सूत्रसंचालन आणि नटरंग चित्रपटातील ‘आता वाजले की बारा’ या गाण्यातून लक्ष वेधून घेणारी अमृता खानविलकर, मराठी सिनेमा साठी एक वेगळा चेहरा लोकांचे समोर आला. तिचा अभिनय बघून चाहते देखील घायाळ होतात. हिंदी मध्ये देखील तिने तिचे नाव कमावले आहे, अमृता एका चित्रपटासाठी दहा ते बारा लाख रु’पये मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
5) उर्मिला कोठारे:- मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ या चित्रपटातून तुफान असा अभिनय करून उर्मिलाने चाहत्यांच्या मनावर आपली एक वेगळीच छाप टाकली आहे. लक्षवेधी भूमिका साकारणारी उर्मिला कोठारे हिचा अभिनय बघून चाहते देखील जल्लोशीत होतात. उर्मिला कोठारे एका चित्रपटाचे सात लाख रु’पये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
6) उमेश कामत:- मराठी फिल्म इंडस्ट्रीत अजून एक चेहरा म्हणजे उमेश कामत. उमेश कामत या अभिनेत्याने सुरुवातीस खूप साऱ्या मराठी चित्रपटातून काम केलं आहे. सध्या मराठी मालिका आणि नाटक यात देखील तो अभिनय करताने आपल्याला दिसून येत आहे. अलीकडेच त्याचे ‘दादा एक गुड न्यूस आहे’ हे त्याचे नाटक प्रचंड गाजले आहे. उमेश कामत हा एका चित्रपटासाठी 11 लाख रु’पये इतके मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
7) सोनाली कुलकर्णी :– मराठी नगरीतील सगळ्याची लाडकी अशी अप्सरा म्हणून गणली जाणारी सोनाली कुलकर्णीने हीसुद्धा मराठीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. सोनाली कुलकर्णीचे बरेच असे चित्रपट आहे जे आजही लोकांचे आठवणीत आहेत.
त्यामध्ये तिचा ‘बकुळा नामदेव घोटाळे’ हा सुरूवातीचा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यानंतर तिने ‘नटरंग’ या चित्रपटातून मराठी चित्रपटात चार चाँद लावले होते. ‘हिरकणी’ ला तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपट केले. सोनाली कुलकर्णी ही एका चित्रपटासाठी 12 लाख रु’पये मानधन घेत घेत असल्याचे समोर आले आहे.
8) स्वप्निल जोशी:- मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व मुलींचा आवडता हिरो आणि चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशींची ओळख आहे. मराठीतला शहारुख म्हणून त्याची खास ओळख आहे. तसं तर स्वप्नीलने बालपणी महाभारत मध्ये भूमिका साकारत अभिनय केला होता.
त्यासोबतच त्याने भरपूर मालिकेतही काम केलं आहे. मराठी सिनेमाला नवी ओळख स्वप्नील जोशीनेच दिली आहे. ‘दुनियादारी’, मुंबई – पुणे-मुंबई, मितवा, ‘भिकारी’ यासारखे खुप चित्रपट त्याने मराठी सिनेसृष्टीला दिलें आहे. आता एका चित्रपटासाठी तब्बल पन्नास लाख रु’पये इतके मानधन स्वप्नील जोशी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.