मराठी चित्रपटसृष्टी हादरली! मिमिक्री आर्टिस्ट, मराठी अभिनेत्याचे निधन, सनी देओलसोबत ‘दामिनी’ आणि ‘घातक’मध्ये केले होते काम..

गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यामध्ये को’रो’ना म’हामा’रीने प्रचंड थै’मान घातलेले आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना खूप मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. कंपन्या बंद पडल्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. तसेच वैयक्तिक नुकसान देखील अनेकांचे झालेले आहे.
या म’हामा’रीमुळे अनेक जणांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. तर काही लोक यातुन बरे देखील झाले आहेत. मात्र, त्यांना इतर आ’जार या म’हामा’री नंतर लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिग्गज संगीतकार नदीम श्रवण या जोडीतील श्रावण राठोड यांचे देखील या आ’जाराने नि’धन झाले होते.
तसेच बॉलीवूडने गेल्या वर्षभरात अनेक कलाकारांना गमावलेले आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे देखील क’र्करो’गाने नि’धन झाले होते. त्यानंतर इरफान खान यांचे देखील दु’र्धर आ’जाराने निधन झाले होते. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचे ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचे देखील वृद्धापकाळाने निधन झाले होते. ते 98 वर्षांचे होते.
त्याचप्रमाणे इतर अभिनेत्यांना देखील बॉलिवूडने या वर्षात गमावले आहे. मराठीमध्ये असे काही अभिनेते होते, ज्यांनी हिंदीमध्ये चांगलच करियर केले होते. मात्र, फार कमी लोकांना त्यांची माहिती होती. आपल्याला माधुरी दीक्षित हिने हिंदी चित्रपटात काम केल्याची माहिती आहे. माधुरी ही मराठी आहे. सोनाली बेंद्रे हीदेखील मराठी आहे.
त्याचप्रमाणे भाग्यश्री पटवर्धन मराठी आहे. मात्र, काही असे छोटे मोठे कलाकार असतात, त्यांचे नाव मात्र कुणालाही लक्षात राहत नाही. आज आम्ही आपल्याला एका अशाच अभिनेता बद्दल आपल्याला माहिती देणार आहोत. या अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे. या अभिनेत्याचे नाव ‘माधव मोघे’ असे होते. माधव मोघे यांचे वय 68 वर्षांचे होते.
माधव मोघे हे शोलेतील ठाकूरची मिमिक्री करून प्रकाश झोतात आले होते. या मिमिक्री नंतर त्यांना संजीव कुमारचा डुप्लीकेट म्हणून देखील संबोधण्यात येत होते. माधव मोघे यांनी दामिनी, घातक, विनाशक, पार्टनर यासारख्या चित्रपटात काम केले. 1993 मध्ये आलेल्या दामिनी या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री दिसली होती.
या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याचप्रमाणे एम टीव्हीवरील फालतू या कॉमेडी शोमध्ये देखील ते दिसले. मात्र, खऱ्या अर्थाने त्यांना संजीव कुमार ची शोले मधील ठाकूरची मिमिक्रि करताना अनेकांनी पाहिले, त्यावेळेस त्यांना खूप मोठी प्रसिद्धी मिळाली होती. आता त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृ’तात्म्यास शांती लाभो.