मराठमोळ्या माधुरी दिक्षितची बहीण दिसते माधुरी इतकीच सुंदर, पहा फोटो…

आपल्याला माहित आहे कि बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिचे आज सुद्धा लाखो चाहते आहेत. तिच्या प्रत्येक अदांवर तसेच तिच्या अभिनयावर आजही तिचे लाखो चाहते फिदा आहेत. अशातच माधुरीने आणि सलमान खानने ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन केले. यावेळी तिने संपूर्ण श्रेय आपल्या टीमला आणि सर्वांच्या अभिनयाला दिले.
पण, तुम्हाला माहितीये का ? तिच्या व्यक्तिगत आयुष्यात तिची मुख्य सपोर्ट सिस्टीम कोण आहे ? तर ती दुसरी तिसरी व्यक्ती कोण नसून तिची सख्खी बहिण आहे. माधुरीला इंडस्ट्रीत एवढे वर्ष होऊनही चाहत्यांना तिच्या बहिणींबद्दल कदाचित माहिती नसेल. पण आज आपण तिच्या बहिणीबद्दल जाणून घेणार आहोत जी दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक आहे.
कदाचित माधुरीच्या बऱ्याच चाहत्यांना माहित नसेल कि तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. रूपा दिक्षीत आणि भारती दिक्षीत अशा दोन बहिणी तर अजित दिक्षीत हा एक भाऊ देखील माधुरीला आहे. माधुरीचे स्टारडमचे एवढे होते की, तिच्या कुटुंबावर कुणाचेही लक्ष गेले नाही. माधुरीच्या वडिलांचे नाव शंकर दिक्षीत आणि आ’ई स्रेहलता दिक्षीत असे आहे.
माधुरीच्या बहिणी या ट्रेंड कथ्थक डान्सर्स असून त्यांनी कधीही बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार केला नाही. रूपा आणि भारती आता सेटल झाल्या असून त्या तिघींमधील बाँण्डिंग आपण फोटोंमधून पाहूच शकता. पण आज आपण तिची मोठी बहीण रूपा बद्दल जाणून घेणार आहोत जी माधुरीच्या प्रत्येक सुख दुः’खात तिच्या सोबत असते.
असे असले तरी रूपा ही बॉलीवूडपासून खूपच दूर आहे. तिला चित्रपट आणि लाईमलाईट असलं काही सुद्धा आवडत नाही. पण काही दिवसांपूर्वीच या दोघींना मुंबईमध्ये एकत्र पाहिले होते. तसेच माधुरीने त्या दोघींचा शाळेत असतानाचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. तो फोटो एका नृत्य स्पर्धेचा आहे, त्यात त्या दोघीही आहेत आणि आपल्याला ओळखू सुद्धा येणार नाही की त्यात, माधुरी कोण आहे.
कारण त्यांचे चेहरे बरेच मिळते जुळते आहेत. त्या फोटोला पोस्ट करताना तिने लिहिले आहे की, ‘तो फोटो माझ्या सगळ्यात आवडीचा फोटो आहे ज्यात माझी बहिण आहे. आम्ही शाळेत असताना नृत्य स्पर्धेमध्ये एकत्र भाग घ्यायचो’. तसेच रूपा एक अतिशय साधी मुलगी आहे आणि तिने आपले शिक्षण पूर्ण करण्यावर अधिक भर दिला.
तिला चित्रपटांमध्ये रस नाही, म्हणून ती आपल्या बहिणीच्या कारकीर्दीपासून दूर राहिली. इंटरनेटवर, या दोघीचे आपल्याला एक किंवा दोन फोटोचं बघायला मिळतील, परंतु सोशल मीडियावर आपल्याला तिचे कोणतेही खाते दिसणार नाही. तसेच आपणास सांगू इच्छितो कि माधुरी सारख्याच तिच्या दोन्ही बहिणी सुद्धा उत्कृष्ट कत्थक डान्सर आहेत.
पण असे म्हटले जाते की माधुरीला अभिनेत्री बनवण्यासाठी रूपा आणि भारतीने कधीच बॉलिवुड मध्ये येण्याचा विचार केला नाही. आता माधुरीच्या दोन्ही बहिणी चांगल्या सेटल झाल्या आहेत. माधुरी दीक्षित या मराठी कुटुंबातील आहेत आणि त्याचा जन्म मुंबईत झाला. माधुरी दीक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत पण त्यांनी आपल्या परिश्रम आणि कौशल्याच्या जोरावर आपली कारकीर्द बनविली.
माधुरी दीक्षित यांनी 1984 साली आलेल्या ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. यानंतर माधुरी दीक्षित यांनी बऱ्याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि एकेकाळी त्यांनी श्रीदेवीसारख्या सुपरस्टार्सशीही स्पर्धा केली होती, आजही प्रत्येकाला त्यांच्या सौंदर्याची भुरळ पडते.