मराठमोळी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या पतीविषयी ‘या’ गोष्टी माहितीय का ? आहे ‘हे’ दिग्ग्ज दिग्दर्शक..

९०च्या दशकातील अनेक अभिनेत्री आपल्या नैसर्गिक आणि निखळ सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. आजही त्या अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि आकर्षित दिसतात. केवळ बॉलीवूडचं नाही तर त्याकाळातील अनेक मराठी अभिनेत्री आजही चाहत्यांच्या मनात आपली जागा बनवून आहेत.
आजही त्या अभिनेत्रीचा भला मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच त्यापैकी अनेक अभिनेत्री मालिकांमधून किंवा सिनेमांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असतात. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा आजदेखील मोठा चाहतावर्ग आहे. सुख म्हणजे काय असत या मालिकेत जरी त्या सासूची भूमिका साकारत असल्या तरीही, त्यांचे सौंदर्य सध्याच्या तरुण अभिनेत्रींना देखील टक्कर देत आहे.
त्याचबरोबर, अभिनेत्री निवेदिता सराफ अग्गबाई सुनबाई मालिकेतून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतच आहेत. अभिनेत्री किशोरी शहाणे यादेखील आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांचे मनोरंजन करतच आहेत. सध्या गुम है किसी के प्यार मे या हिंदी मालिकेमध्ये त्या काम करत आहेत. याआधी देखील त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
घर एक मंदिर, कोई अपना सा, सिंदूर तेरे नाम का यासारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. मात्र त्यांनी आपल्या करियरची सुरुवात मराठी सिनेमामधून केली होती. माझा पती करोडपती, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, माहेरची साडी अशा अनेक मराठी सिनेमामध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या उत्कृष्ट अभिनय आणि फिटनेसमुळे कायमच त्या चर्चेत राहिल्या.
या वयात देखील त्यांचा फिटनेसबद्दलचा जागरुकपणा बघून, बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणावतला देखील आश्चर्य वाटले होते. वयाच्या ५३ व्या वर्षी देखील त्या अतिशय सुंदर आणि आकर्षित दिसतात याचे कारण त्यांचा फिटनेसच आहे. कायम चर्चेत असणाऱ्या किशोरी शहाणे च्या पतीबद्दल सर्वाना फारसं माहित नाही. मात्र त्यांचे पती देखील मनोरंजन विश्वातच काम करतात.
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक दीपक बलराज वीज यांच्यासोबत किशोरी यांचा विवाह झाला. किशोरी शहाणे यांचे सासरे बलराज वीज यांनी बॉलीवूच्या हीमॅन अर्थात धर्मेंद्र सोबत अनेकवेळा काम केले. स्वतः दीपक वीज यांनी तब्ब्ल २२ सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. जान तेरे नाम या सिनेमाचे दिग्दर्शन देखील दीपक वीज यांनी केले आहे.
किशोरी अनेकवेळा आपल्या पतीसोबतचे फोटो, सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोजला चाहत्यांची चांगलीच पसंती देखील मिळत असते. किशोरी आणि दीपक यांना एक मुलगा असून त्याने नाव बॉबी आहे. बॉबी एक मॉडेल आहे.
अनेक प्रसिद्ध डिझायनरसाठी त्याने काही फॅशन शो केले आहेत. काही मॅगझिन्स साठी त्याने फोटोशूट देखील केले आहे. बॉबीला देखील आपल्या आईप्रमाणेच फिटनेसचे प्रचंड वेड आहे. अनेकवेळा तो इंस्टाग्राम वर किशोरी यांच्यासोबत काही भन्नाट व्हिडियो बनवून पोस्ट करत असतो.