‘मन उडू उडू झालं’ मधील शलाका आहे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, बघा Photo

केवळ हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येच नाही तर आता मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील आपण मायलेकींची जोडी बघितली आहे.
अनेक वेळा त्या अभिनेत्रींना ओळख देखील क’ठीण होऊन जाते. बऱ्याच वेळा नवखी अभिनेत्री आपल्या आईच्या ओळखीशिवाय, काम करून स्वतःची नवीन ओळख बनवण्यासाठी धडपडत असते. आपण अनेक वेळा पाहिले आहे की केवळ हिंदीच नाही तर, मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक अभिनेत्री सुरुवातीच्या काळात आपली ओळख सांगत नाही.
आईमुळे, वडिलांमुळे किंवा बहिणीमुळे यांना काम भेटले, याचा आरोप कुणीही लावू नये यासाठी या अभिनेत्री किंवा अनेक अभिनेते असे करतात. मात्र आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर नक्कीच आपल्या आई वडिलांची ओळख अगदी अभिमानाने सांगतात. स्वतःच्या प्रतिभेवर आपली ओळख निर्माण करणाऱ्या मोजक्याच कलाकारांपैकी एक आहे शर्वरी कुलकर्णी.
सध्या झी मराठी वाहिनीवर ‘मन उडू झालं ‘ही नवीन मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेचे कथानक काहीसे वेगळे असल्याचे सध्यातरी भासत आहे, त्यामुळे ओपनिंग आठवड्यामध्येच या मालिकेचा टीआरपी उत्तम होता. सध्या सगळीकडेच या मालिकेची चर्चा सुरू आहे.
फुलपाखरू या मराठी मालिकेतून नावारुपास आलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे या मालिकेत दीपाची भूमिका साकारत आहे, त्याचबरोबर अभिनेता अजिंक्य राऊत इंद्रची भूमिका साकारत आहे. या मालिकेचे प्रमुख कलाकार जेवढे दमदार आहेत, तेवढेच इतर कलाकार देखील चर्चेत आहेत. अरुण कदम, पूर्णिमा तळवळकर, रूपलक्ष्मी चौगुले हे कलाकार देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत.
या मालिकेतील देशपांडे कुटुंबामध्ये,दीपा, सानिका आणि शलाका या तीन मुली दाखवल्या आहेत. या तीन मुलींच्या आयुष्यावर ही मालिका आधारित असणार आहे. याच मालिकेत शलाकाची भूमिका साकारणारी, शर्वरी कुलकर्णी सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे शर्वरी कुलकर्णीची आईदेखील,मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सध्या मन उडू उडू झालं, या मालिकेत शलाकाच्या लग्नाची घाई सुरू आहे. लग्न करून शलाका अमेरिकेला जाणार आहे, त्यामुळे संपूर्ण देशपांडे कुटुंब तिच्या लग्नाची जबरदस्त तयारी करत आहे. परंतु शलाकाच्या सासरच्यांकडून,लग्नासाठी वेगवेगळ्या मागण्या करत त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. या मागण्या पूर्ण करत असतानाच देशपांडे कुटुंबाला चांगल्याच आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
आणि त्यातच पिशवीत ठेवलेले पैसे कोणीतरी लुटून नेले, त्यामुळे त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. यातून आता शलाकाचे लग्न होणार की नाही,असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामध्ये निरागस अशा शलाकाचे पात्र थोडेसे घाबरत दाखवले असले तरीही खऱ्या आयुष्यात शर्वरी अगदी बिनधास्त आहे.
सोनी मराठी वरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर शरवरीने पदार्पण केले होते. यामध्ये तिने मीराची भूमिका साकारली होती. शर्वरी एक उत्तम नर्तकी असून तिने अभिनयाचे धडे देखील गिरविले आहेत. याआधी अनेक नाटकांमधून देखील तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, संपदा कुलकर्णी यांची शर्वरी कुलकर्णी मुलगी आहे.
काही महिन्यापूर्वी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये, तिने विवो बोरकर यांच्या सोबत लग्न केले आहे. संपदा कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटांसह अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. बऱ्याच मंचावरून तिने सूत्रसंचालकाची भूमिका देखील बजावली आहे. मागच्या काही वर्षांपासून संपदा कुलकर्णी आपले पती राहुल कुलकर्णी यांच्यासोबत कोकणातील गावी राहत आहे.
आता हे धावपळीचं शहरी जीवन सोडून सध्या कुलकर्णी जोडपं कोकणात शेती करण्याचा आनंद घेत आहेत. ‘आनंदाचं शेत’ यामाध्यमातून ती इतरांना देखील शेती व्यवसाया तो येण्यास प्रोत्साहन देत आहे. काही दिवसांपूर्वी, तिने आपला शेतकरी बनण्याचा प्रवास सोशल मीडिया द्वारे आपल्या चाहत्या पर्यंत पोहोचला होता. तेव्हा, तिचे तोंड भरून कौतुक देखील करण्यात आले होते. सध्या शर्वरी आपल्या अभिनयाने आईची कमी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे.