‘भावाचा एवढा पुळका येतो तर त्याला घरी घेऊन जा’, बिग बॉसमध्ये भावाला सपोर्ट केल्यामुळे आदर्श शिंदेला लोकांनी सुनावले खडे बोल..

मनोरंजन
बिग बॉस म्हटलं की रोजची भांडण, वा’द हे सर्व चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र, याही पुढे जाऊन एक चित्र कायमच सगळ्यांच्या समोर उभे राहते. ते म्हणजे विकेंडचा भाग. बिग बॉस हिंदीचे सूत्रसंचालन सलमान खान करतो. त्यावेळी त्याच्यावरती कोणत्यातरी एकाच सदस्याची बाजू चांगल्या पद्धतीने मांडण्याचा आरोप, बऱ्याच वेळा करण्यात आला आहे.
सिद्धार्थ शुक्ला आणि आसीम रियाजच्या भां’डणाच्या वेळेस, सलमान खान केवेळ सिद्धार्थचीच बाजू मांडत होता, असा आ’रोप त्याच्यावर केला गेला होता. तर, त्याबरोबरच मागील पर्वात, जाणून बुजून अनेक वेळा तो केवळ रुबीना दिलेकला टार्गेट करत आहे, असा आरोप अनेकांनी त्याच्यावर केला होता.
आता असेच काही दृश्य बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये देखील बघायला मिळत आहे. बिग बॉस मराठीवर यांच वीकेंडच्या भागाला ‘बिग बॉसची चावडी’ म्हणून नाव आहे. या चावडीसाठी सर्वजण कायम उत्सुक असतात. पहिल्या दोन्ही पर्वाच्या वेळी महेश मांजरेकर यांनी उत्तम सूत्रसंचालन केले, आणि त्यामुळे चाहत्यांना सोबत बांधून ठेवण्यात त्यांना यश मिळाले.
म्हणूनच, तिसऱ्या परवाच्या सूत्रसंचालनासाठी देखील त्यांची निवड करण्यात आली. मात्र आता, याच महेश मांजरेकरवर आदर्श शिंदेने घणघणाती आ’रोप केला आहे. आदर्श शिंदे यांचा भाऊ उत्कर्ष सध्या बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून खेळत आहे. पहिल्या आठवड्यात त्याच्या खेळाचे सर्वांनीच कौतुक केले. महेश मांजरेकर यांनी देखील उत्कर्ष तू चांगला खेळत आहेस असे म्हणून, त्याला दाद दिली होती.
परंतु दुसऱ्या आठवड्यात उत्कर्षाचा खेळ पूर्णपणे पार्शल असल्याचा बघायला मिळाला. शिवाय त्याने त्यामध्ये आपल्या मित्रांच्या गटाला जिंकण्यासाठी, संचालक असून देखील योग्य निर्णय न घेतल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगलंच ट्रो’ल केलं होतं. त्यावरून बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरने उत्कर्ष शिंदेचा चांगलाच क्लास घेतला.
उत्कर्षने पक्षपात केला त्यामुळे, त्याचा चांगलाच सुरू असलेला गेम पुन्हा चुकीच्या दिशेने जात आहे, असे ठणकावून महेश मांजरेकर यांनी त्याला सांगितले. मात्र त्याचा भाऊ आदर्श शिंदे याला हे फार रुचलं नाही. आदर्शने आपल्या भावाच्या समर्थनात सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली.
बिग बॉसची चावडीच डबल ढोलकी आहे, अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली. ‘विशालने कॅप्टन टास्कमध्ये, उत्कर्षला मदत केली. म्हणून उत्कर्षने देखील परतफेड म्हणून विशालला नॉमिनेशन प्रक्रीयेत सेव केलं. मात्र चावडीला हा फेअर गेम चवडीला दिसला नाही. केवळ उत्कर्षला टार्गेट करायचं म्हणून, त्याच्यावर पक्षपाताचा आ’रोप करत आहेत.
म्हणून बिग बॉसची चावडीच डबल ढोलकी आहे, असं मला वाटत आहे.’ असं आदर्शने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. मात्र यावरून नेटकऱ्यांनी त्याचाच चांगलाच समाचार घेतला आहे. अनेक चाहत्यांनी आपल्या भावाची बाजू घेणाऱ्या आदर्शला चांगलंच सुनावल आहे. ‘बिग बॉस पेक्षा तुम्ही मोठे नाहीच, एवढा राग येतो तर बिग बॉस मध्ये गेला तर कशाला’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला.
‘तुला एक राग येत असेल तर, आपल्या भावाला घेऊन घरी जा. आम्ही काय आंधळे नाही, आम्ही पण हे सगळं काही बघत आहोत.’ असं दुसऱ्या चाहत्याने आदर्शला सुनावलं. तर. ‘नाचता येईना अंगण वाकडे, म्हणे चावडी डबल ढोलकी आहे’ अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. ‘ह्या अशा डबल ढोलकी पोस्टमुळे, आता त्याला जी काही मते मिळाली असती ती पण बोंबलली’ अशी कमेंट दुसऱ्याच्या चाहत्यांनी केली आहे.