वजनावरून ट्रोल होणाऱ्या रिंकूचे हॉ’ट आणि ग्लॅमरस फिगर पाहून चाहते झाले शॉक ! म्हणाले ही तर…पहा फोटो ..

सैराट सिनेमातील बेधडक आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला वेगळ्या ओळखीची आवश्यकता नाहीये. या सिनेमाने लोकप्रियतेचे नवीन शिखर गाठलं. केवळ महाराष्ट्रात नाही तर, संपूर्ण देशात या सिनेमाने धुमाकूळ घातला होता. आपल्या पहिल्याच सिनेमामधून आर्ची म्हणजेच रिंकूचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता.
त्यानंतर रिंकूने माघे वळून पहिलेच नाही. रोजच नव-नवीन प्रोजेक्ट्स तिच्याकडे येत होते. आणि त्यातून तिने देखील अगदी अचूक अश्या प्रोजेक्ट्सची निवड करत, आपल्या उत्तम अभिनयाचा परिचय देतच राहिली आहे. त्यामुळे, सैराट सिनेमाच्या इतक्या वर्षानंतर देखील तिचे लाखो चाहते आहेत.
सैराट सिनेमानंतर त्याच्याच साऊथ रिमेक सिनेमा मानसु मल्लीगे या सिनेमा मध्ये काम केलं आणि दक्षिण सिनेसृष्टीमधे देखील तिने लोकप्रियता कमावली. अनपोझ्ड आणि हंड्रेड या हिंदी वेबसिरीज मध्ये तिने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयनाचा परिचय दिला आणि हिंदी सिनेसृष्टीमधे देखील आपला जम बसवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
सुरुवातीपासूनच रिंकू चर्चेचा विषय ठरली आहे. तिचे काम, तिचे वैयक्तिक आयुष्य म्हणजेच जवळपास सर्वच कायमच चर्चा रंगवत आली आहे. तिच्या कामासोबतच, तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे याबद्दल जाणून घेण्यास चाहते कायमच उत्सुक असतात. सैराट सिनेमा मध्ये, असणाऱ्या वयापेक्षा जास्त दिसण्यासाठी तिने काही वजन वाढवले होते.
त्यानंतर तिच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे कौतुक सगळीकडेच सुरु होते, मात्र त्याचबरोबर तिच्या वजनावरून तिला ट्रोल करण्यात येत होते. तिच्या वजनावरून तिला कृतिसाईज केलं जात होत. त्यामुळे, रिंकूने आपले वजन कमी करण्याचे ठरवले. वजन कमी करुन, फिट बॉडी पाहिजे असं तिने मनाशी निश्चित केलं आणि त्यासाठी मेहनत घेतली.
योग्य आहार आणि त्याचबरोबर योग्य व्यायाम यावर तिने भर दिला आणि चबी दिसणारी रिंकू अगदी फिट झाली आहे. आपला फिटनेस, तिने काही फोटोंच्या माध्यमातून दाखवला आहे. आपली हॉट आणि सेक्सी बॉडी आणि फ्लॅट टमी तिने या फोटोंमध्ये फ्लोन्ट केली आहे. या फोटोजमध्ये ती खूपच सुंदर आणि तेवढीच हॉट दिसत आहे.
तिचा फिटनेस आणि से’क्सी फिगर बघून चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत. माघील काही तासांपासून तिच्या याच फोटोंची चर्चा सुरु आहे. रिंकूच्या हॉ’ट फोटोजने सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होत आहे. लवकरच रिंकू मराठी सिनेमा छूमंतर मध्ये, दिसणार आहे.
यामध्ये प्रार्थना बेहरे, ऋषी सक्सेना आणि सुव्रत जोशी सोबत रिंकू देखील प्रमुख भूमिकेत दिसणार असून या सिनेमाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले आहे. त्याचबरोबर रिंकू, बॉलीवूडच्या बिगबी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड या हिंदी सिनेमातसुद्धा दिसणार आहे.