भारतीय खेळजगतावर दुःखाचा डोंगर! पत्नीच्या मृ’त्यूच्या २ दिवसांतच ‘या’ दिग्ग्ज खेळाडूचे को’रो’नाने नि’धन…

भारताचे महान धावपटू म्हणून मिल्खा सिंग यांची ओळख आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत विजेतेपद आणि आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक पटकावणाऱ्या मिल्खा सिंग यांना Flying Sikh म्हणून जगभरात ओळखले जाते. १९६० साली रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली.त्यानंतर जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली.
मिल्खा सिंग यांच्या वेगानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. एका दशकाहून अधिक काळ त्यांनी ट्रेक अॅण्ड फिल्डमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ मध्ये गोविंदपुर येथील एका शीख कुटुंबात झाला होता आणि फाळणीपश्चात ते भारतात आले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांची को’रो’नासोबतची झुंज ते हरले.
आणि शुक्रवारी रात्री १८ जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ते कोरोनासोबत लढा देत होते. बालपणापासूनच मिल्खा सिंग यांना खेळात चांगलाच रस होता. भारतात आल्यानंतर ते सैन्यात सामील झाले होत आणि इथूनच त्यांच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं. मिल्खा सिंग यांना सैन्य भरतीमध्ये तीन वेळा निराशा पदरी आली होती.
तीन वेळा त्यांना सैन्याने नाकारलं होत आणि चौथ्यांदा त्यांची निवड झाली. सैन्यामध्ये असताना आपल्या कौशल्यांना त्यांनी अधिक परिष्कृत केले. क्रॉस-कन्ट्री रेसमध्ये मिल्खा सिंग ४०० हून अधिक सैनिकांसह धावले होते.आणि त्यामध्ये ते सहाव्या स्थानी आले. याच काळात त्यांचं नशीब बदललं आणि त्यांच्या मजबूत कारकिर्दीचा पाया घातला गेला.
त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि आपली छाप सतत सोडली. राष्ट्रीय खेळांशिवाय कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक आणि सोबतच आशियाई स्पर्धेत ४ गोल्ड मेडल पटकावले. मात्र, मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडल याचे कारण वेगळं आहे. एका पाकिस्तानी धावपटूला हरवल्यामुळे त्यांना हे पडलं आहे.
मिल्खा सिंग यांनी पाकि’स्तान’च्या चोटीमधील धावपटू अब्दुल खालिक यांनी हरवलं होतं आणि यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान फील्ड मार्शल आयूब खान यांनी त्यांना ‘द फ्लाईंग शीख’ असं नाव दिलं होतं. मिल्खा यांना हे पदक देत आयूब खान म्हणाले होते, ‘आज मिल्खा धावत नव्हते तर लढत होते, त्यामुळे आम्ही त्यांनी फ्लाईंग शीखचा किताब देत आहोत.’
१७ मे रोजी मिल्खा सिंग यांची को’विड चा’चणी झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझि’टिव्ह आला होता. तब्येत जास्त बिघड’ल्यामुळे त्यांना मोहाली येथील फोर्टिस रु’ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती, आणि म्हणून त्यांना ३१ मे रोजी त्यांना रु’ग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डिस्चार्जनंतर ते सेक्टर-8 येथील आपल्या घरात को’विड नियमांचं पालन करीत आराम करीत होते.
मिल्खा सिंग यांच्या कूक ला सगळ्यात पहिले को’रोनाचा सं’सर्ग झाला होता आणि त्यानंतर त्यांना आणि पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना को’रोनाचा सं’सर्ग झाला. को’रोनासोबत झुंज देणाऱ्या निर्मल कौर यांना २६ मे रोजी मोहालीच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. कुटुंबाच्या विनंतीवरून मिल्खा सिंग यांना एका आठवड्यानंतर सोडण्यात आलं.
पण, निर्मल यांना रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. नंतर मिल्खा सिंग यांना पीजीआयच्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या पत्नी निर्मला यांनी १३ जून रोजी रविवारी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर ३च दिवसात मिल्खा सिंग यांनी देखील अखेरचा श्वास घेतला. १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी सर्वोत्तम अशी कमगिरी केली.
पण त्यांचे कांस्यपदक फारच थोड्या फरकाने हुकले आणि त्यामुळे त्यांना चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं होतं. मिल्खा यांनी या स्पर्धेत पदक न मिळण्याचं कारण त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगित असताना ते बोलले होते, ‘माझी सवय होती, की प्रत्येक शर्यतीवेळी एकदा तरी मी मागे वळून पाहायचो.
ऑलिम्पिक स्पर्धेत शर्यत खूप जवळ होती आणि मी जबरदस्त सुरुवात केली. मात्र, यात मी एकदा मागे वळून पाहिलं आणि कदाचित ही चूक मला महागात पडली.’ या शर्यतीत कांस्यपदक विजेत्याचा वेळ ४५.५ होता तर मिल्खा सिंग यांनी ४५.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली होती.एका सेकंदाने ते माघे राहिले होते.