भारतात लाँच होण्यापूर्वीच ‘मुकेश अंबानी’सहित फक्त ‘या’ ५ लोकांकडे आहे ‘टेस्ला’ कार किंमत वाचून चकित व्हाल..

भारतात लाँच होण्यापूर्वीच ‘मुकेश अंबानी’सहित फक्त ‘या’ ५ लोकांकडे आहे ‘टेस्ला’ कार किंमत वाचून चकित व्हाल..

रेंज रोव्हर, रोल्स रॉयल अश्या वेगवेगळ्या महागड्या गाड्यांची नावं आपल्याला माहीतच आहेत. या कंपनीच्या वेगवगेळ्या गाड्या आपण भारताच्या मोठाल्या उद्योगपती, स्टार्स आणि नेत्यांकडे पहिल्या देखील आहेत. भारतात देखील अनेक महागड्या गाड्यांचे शौकीन लोकं आहेत.

ज्यांना बाकी काही नाही, मात्र महागड्या गाड्या घेणे आणि चालवणे खूप आवडते. अर्थातच, गर्भश्रीमंत लोकांना ते परवडते. नाही तर असे अजूनही खूप लोकं आहेत. ज्यांचं केवळ एक गाडी घेण्याचं स्वप्न अजूनही स्वप्नच आहे. महागड्या गाड्यांचे देखील वेगवेगेळे मॉडेल्स असतात, आणि त्यांच्या वेगवगेळ्या किमती असतात.

अशातच टेस्ला या जगातील सर्वोत्तम गाड्यांपैकी एक समजल्या कंपनीने भारतात आपले नाव रजिस्टर केले आहे. लवकरच टेस्ला कार भारताच्या रस्त्यांवर पाळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. या कारच्या किमती प्रचंड जास्त आहेत. तस बघायला गेलं तर, इतर काही प्रगत देशांमध्ये टेस्ला कारची किंमत भारतीय करन्सी मध्ये रूपांतरित केल्यावर जास्त नाहीये.

मात्र, या कार बाहेरून घेऊन येणार असल्यामुळे, भारतामध्ये त्यांची रक्कम चांगलीच असणार आहे. टेस्ला कारची किंमत अमेरिका मध्ये या कारची किंमत ३८ हजार युएस डॉलर्स ते ५५ हजार युएस डॉलर म्हणजेच भारताच्या करन्सीनुसार २७.५ लाखांपासून ते ४० लाखांपर्यंत आहे. मात्र भारतामध्ये याच कारसाठी ७५ लाख ते १ कोटी रुपये खर्च करावे लागतील. आपल्या देशात काही लोकांकडे ही कार आहे.

१.प्रशांत रुईया :- एसार कंपनीचे सीईओ, प्रशांत रुईया यांच्याकडे टेस्ला कार आहे. टेस्ला कारचे मॉडेल एक्स प्रशांत रुईया यांच्याकडे आहे. या कारची किंमत २ कोटींची आहे.ही कार अत्यंत सुंदर आहे. या कारचे दरवाजे वर उघडतात. महागड्या कर प्रेमींना आवडणाऱ्या सर्व बाबी या गाडीमध्ये आहेत.

२.रितेश देशमुख :- बॉलीवूडचा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यांना त्यांच्या लाडक्या बायकोने म्हणजेच जेनेलिया देशमुखने गिफ्ट केली आहे. ही कर कॅलिफोर्निया मध्ये विकत घेतली आहे. कॅलिफोर्निया मध्ये या कारची किंमत ६५-७० लाख इतकी असून, ती कार देशमुख कुटुंब तिथेच वापरतात.

३. पूजा बत्रा :- ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल पूजा बत्राकडे टेस्ला कार आहे. कॅलिफोर्नियामध्ये तिने ही कार ३७लाखांना खरेदी केली आणि तिथेच वापरते.

४. मुकेश अंबानी :- टेस्लाची मॉडेल एस ही कार मुकेश अंबानी यांनी अमेरिकेतून सेकंड हॅन्ड विकत घेतली आहे. या कारची किंमत १कोटी ४५ लाख इतकी आहे. सध्या भारतामध्ये, १५-२० टेस्ला कार आहेत. मात्र जवळपास सर्वच एसयुव्ही आहेत. भरतीय लोकांनी अशाच एसयुव्ही कार ला पसंती दिली आहे. लवकरच बेंगलोर मध्ये टेस्ला कारचे शोरुम सुरू होत आहे. त्यानंतर अनेकजण ही मॉडर्न कार विकत घेऊ शकतील. नक्की कोणते मॉडेल भारतामध्ये लाँच करण्यात येणार आहे, याबद्दल अजूनही कोणतेही विधान कंपनीकडून आलेलं नाहीये.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *