‘भाभीजी घर पर है’ फेम मराठमोळी ‘नेहा पेंडसे’ने खुल्लम खुल्ला केला किस, व्हिडिओ पाहून चकित व्हाल…

मनोरंजन
साराभाई वर्सेस साराभाई, खिचडी, तारक मेहता का उलटा चष्मा, चिडिया घर यासारख्या काही कॉमेडी मालिका चांगल्याच लोकप्रिय ठरल्या. देख भाई देख, तू तू मै मै, हमी पांच यासारख्या मालिकांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. अशा अनेक कॉमेडी मालिकांपैकीच एक ‘भाभीजी घर पर है’ ही प्रसिद्ध मालिका आहे.
अल्पावधीतच या मालिकेने, भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला. या मालिकेचे हलकं-फुलकं कथानक, आणि कलाकाराचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. शहरातील सुंदर भाभी अनिता मिश्रा आणि विभूती मिश्रा, सोबतच गावाकडील सर्वसाधारण भोळी अंगुरी भाभी आणि मनमोहन तिवारी या प्रमुख पात्रांनी, देखील प्रचंड लोकप्रियता मिळवली.
बऱ्याच काळापर्यंत, अनिता भाभीजी भूमिका अभिनेत्री सौम्या टंडन साकारत होती. मात्र काही कारणास्तव, सौम्या टंडनने ही मालिका सोडली आणि त्यानंतर नेहा पेंडसेने ही भूमिका साकारली. नेहा पेंडसेने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. प्यार कोई खेळ नही आणि देवदास सारख्या सिनेमामध्ये ती झळकली होती.
कॅप्टन हाऊस या मालिकेमधून तिने हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिका आणि सिनेमामध्ये तिने काम केले. मे आय कमी इन मॅडम, या मालिकेत आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कॉमेडी शोमध्ये तिने आपल्या बो’ल्ड लूकने ग्लॅमरचा तडाखा लावला होता.
नाना पाटेकर यांच्या बहुचर्चित मराठी सिनेमा नटसम्राट मध्ये देखील ती झळकली होती. बिग बॉसच्या बाराव्या सीझनमध्ये देखील, ती झळकली होती. मात्र बिग बॉसमधून, ती लवकरच बाहेर पडली.त्यानंतर अनेक कॉमेडी शोजमध्ये देखील ती झळकली होती. मागच्याच वर्षी नेहाने उद्योगपती शार्दूल बायससोबत लग्न केलं. सोशल मीडियावर नेहा चांगलीच सक्रिय असते.
आपल्या पतीसोबतचे अनेक फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. असाच एक व्हिडियो तिने शेअर केला होता. एका हॉटेलच्या, बार काउंटरवर आपल्या पतीसोबत नेहा उभी असलेली दिसत आहे. त्यामध्ये ती आपल्या नवऱ्याला कि’स करत असल्याचं बघायला मिळत आहार. सगळीकडेच या व्हिडियोने धुमाकूळ घातला आहे.
तिच्या या व्हिडियोवर, चांगल्याच कमेंट येत आहेत. ‘अरे भाभीजी तुम्ही लग्न कधी केलं’ असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहि. ‘भाभीजी, आता तिवारीजी बिचारे खूपच नाराज होतील,’ असं दुसऱ्याने कमेंट केलं आहे. ‘भाभीजी, तुम्ही लग्न करून आमचं मनच मोडलं हो.आणि सोबत असा व्हिडियो, आमचा नाहीय तर तिवारीजीचा तरी विचार करायचा ना,’ असं देखील एका नेटकाऱ्याने म्हणले आहे. ‘अनिता भाभी, आम्हला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ असं एका चाहत्याने कमेंट केलं आहे.