बॉलीवूडमध्ये काम मिळत नसल्यामुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झळकणार मराठी मालिकेत, प्रार्थना बेहरेसोबत करणार काम…

बॉलीवूडला मायानगरी म्हणून देखील ओळखल जातं. रोज आपले स्वप्न पुनः करण्यासाठी कित्येक स्ट्रगलर्स या मायानगरीच्या चंदेरी दुनियेत पदार्पण करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये काहींना खरोखर यश मिळतं आणि काही कित्येक वर्ष संघर्ष करतच राहतात. असे नाहीये की, सगळ्यांनाच अपयश मिळते. काहींना भरगोस यश आणि कीर्ती देखील मिळते.
मात्र मिळालेले हे यश सांभाळणे प्रत्येकालाच जमत नाही. चुकीची स्क्रिप्ट किंवा चुकीचा सिनेमा केलं की तो सिनेमा फ्लॉप होतो आणि मग पुन्हा दुसऱ्या सिनेमा मध्ये काम करण्यासाठी त्यांना स्ट्रगल करावा लागतो. एक चुकीचा सिनेमा, बनलेलं करियर संपू शकत. असे खूप कलाकार आहेत, ज्यांचे सुरुवातीचे २-३ सिनेमा चांगले सुपरहिट ठरले.
मात्र, त्यानंतर योग्य फिल्म न मिळाल्यामुळे ते अचानक गायब होऊन जातात. असच एक नाव आहे मराठमोळ्या श्रेयस तळपदेचं. नागेश कुंकूरच्या इक्बाल या सिनेमामधून बॉलीवूडमध्ये जबरदस्त पदार्पण केलं. त्या सिनेमामध्ये आपल्या दमदार अभिनयामुळे श्रेयस सगळीकडेच मोठा चाहतावर्ग निर्माण केला. क्रिटिक्स आणि बॉलीवूड मधील दिग्गजांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली.
त्याआधी श्रेयसने दामिनी, आभाळमाया, अश्या काही मराठी मालिकांमध्ये देखील काम केला होत.सुरुवातीपासूनच त्याच्या कामाचं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याने चांगलीच चर्चा रंगवली होती. मात्र, तो बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी हातपाय मारतच होता आणि इक्बाल या सिनेमाद्वारे त्याला ती संधी मिळाली.
त्याने देखील संधीचे सोनं केलं आणि त्यानंतर डोर, ओम शांती ओम सारख्या सिनेमामध्ये देखील काम केलं आणि त्याच्या अभिनयाचं कौतुक देखील करण्यात आलं होत. मात्र त्याला पुढं, फारसं यश मिळालं नाही. त्याने बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमामध्ये काम केलं, मात्र उत्तम सस्क्रिप्ट नसल्यामुळं त्या सिनेमांना अपयश आलं. त्याने रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीजमध्ये देखील काम केलं मात्र हवं तास यश मिळतच नव्हतं.
म्हणून त्याने आपला मोर्चा पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळवळ. पोस्टर बॉईज या सिनेमाचा निर्माता बनला आणि सोबतच बाजी या सिनेमामधून काम देखील केले. मात्र, या सिनेमाने देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. म्हणून आता श्रेयस तब्ब्ल १८ वर्षानंतर पुन्हा मराठी मालिकांमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे.
तर दुसरीकडे, पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेमधून ओळख निर्माण केलेल्या प्रार्थना बेहरेने मराठी सिनेमामध्ये काम केलं आहे. मितवा, कॉफी आणि बरंच काही सारख्या मराठी हिट सिनेमामध्ये प्रार्थनाने काम केल आहे. काही महिन्यांपूर्वी तिने विवाह केला आहे.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे.
आणि त्यामुळे सुरु झालेलं प्रोजेक्ट्स बंद झाले आहेत. कदाचित म्हणूनच सध्या मोठाले दिग्गज कलाकार आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवत आहेत. मुक्ता बर्वे आणि उमेश कामात हे दोघेही लवकरच अजूनही बरसात आहे या मालिकेमधून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. आणि आता श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहरे हे दोघेही एका मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या मालिकेचे चित्रीकरण सुरु होत आहे. झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्यांची टीम मालिकेच्या मेकर्सला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या चढाओढीत नक्की कोणत्या वाहिनीला यश मिळेल हे बघणे रोमांचक असेल.