बॉलीवुड सिताऱ्यांच्या लग्नात बंद पॉकेट मधून दिले जातात मात्र इतके रुपये, बिग बीने उघड केलेल्या गुपीतावर तुमचाही बसणार नाही विश्वास…

आपण सर्वजण कुणाच्या ना कुणाच्या तरी लग्नाला जातच असतो. आपल्याकडे भारतीय संस्कृतीत अशी परंपरा रूढ आहे की लग्नाला जाताणे कोणीही रिकाम्या हाती जात नसते. लग्नातील वधू आणि वर यांना काहीना काही भेटवस्तू देण्याची प्रथाच पडली आहे. परंतु लग्नासाठी जा कोणीही विचारते की तुम्ही वर वधूला काय घेऊन जाणार आहात. किंवा कोणती भेटवस्तू तुम्ही घेणार आहात. तेव्हा बर्याच जणांचे असे उत्तर असेल की वधू वरासाठी लिफाफामध्ये काही पैसे घेऊन शगुनच्या रूपात काही पैसे वधू वराला देणार आहात.
हे झाले सामान्य लोकांचे लग्नातील रहस्य. परंतु तुमच्या मनात असा प्रश्न देखील पडत असेल की जेव्हा एखाद्या मोठ्या स्टारचे लग्न असते तेव्हा त्यांच्या लग्नात येणारे अतिथी त्यांना काय गिफ्ट देत असतील किंवा सेलिब्रिटीच्या हातात दिलेल्या लिफाफ्यात किती पैसे देतात ? हे सर्व गूढ सामान्य लोकांना कळण्यास कोणतीही संधी उपलब्ध होत नसते. कारण सर्वसामान्य लोक अभिनेत्यांच्या लग्नात उपस्थित नसतात. कारण त्यांना लग्नाचे आमंत्रण नसते.
बहुतेक लोकांच्या मनात हे नक्कीच येत असेल की हे श्रीमंत सेलिब्रिटी च्या अतिथी महागड्या भेटवस्तू देत असतील किंवा बंद असलेल्या लिफाफ्यात मोठी रक्कम असू शकते. पण परिस्थिती याउलट आहे. बॉलिवूडच्या सुपरस्टारनेच हे उघड केले आणि ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. केबीसी 10 च्या भव्य समाप्तीची वेळ होती, त्या दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी फिल्मी विश्वातील अनेक रहस्ये उघडपणे बोलून दाखवली.
दुसरे कोणी असते तर यावर विश्वास ठेवला नसता पण बिग बी बद्दल सर्वांना माहित आहे, तो फक्त बॉलिवूडचा सुपरस्टारच नाही तर अत्यंत सत्याने मनाने वागणारा माणूस आहे जो नेहमी सत्याबरोबर राहतो. जेव्हा एखाद्या अभिनेता किंवा अभिनेत्रींचे लग्न असते तेव्हा त्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या सोबत काम करणारे कनिष्ठ कलाकार किंवा मेकअप करणारे व्यक्ती साठी लग्नात वर आणि वधूला लिफाफ्यात किती पैसे द्यायचे हे चिंताजनक बनते.
याबाबत बिग बी म्हणाले की, याचा विचार करता हे प्रमाणित केले गेले आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या तारकाचे लग्न होत असते आणि चित्रपटाच्या जगाशी संबंधित कोणताही कलाकार त्यांच्या लग्नात जातो तेव्हा तो लिफाफ्यात 101 रुपये सोबत घेऊन जात असतो. हा नियम सर्वांना लागू आहे. आपली वैयक्तिक इच्छा सांगत असताना बिग बी म्हणाले की, त्यांना आपल्या भेटवस्तूंमध्ये फुलांचा पुष्पगुच्छ देण्यास आवडते, परंतु जय बच्चन असे मानत नाहीत कारण नंतर लोक ते गुच्छ फेकून देतात आणि ते जया बच्चन यांना आवडत नाही.