बॉलिवूडमध्ये लगीनसराई ! विकी कौशल कॅटरिनानंतर राजकुमार राव ‘या’ तरुणीशी करणार लग्न, ‘या’ तारखेला अडकणार लग्नबेडीत..

मनोरंजन
असं म्हणल जात की, बॉलिवूडमध्ये खान आणि खानदान जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही मोठे स्टार होऊ शकतात. थोडक्यात काय तर, या चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर कोणी एक गॉडफादर असेल तर, किंवा तुम्ही कोणत्यातरी मोठ्या फिल्मी कुटुंबातील असाल तरच तुम्ही स्टार बनवू शकता.
मात्र केवळ आपले कौशल्य, आपला अभिनय याच्या जोरावर देखील अनेकांनी बॉलीवूडमध्ये स्वतःचे नाव कमवले आहे. अर्थातच, हे सर्व करणे म्हणजे खूप मोठा संघर्षमय प्रवास त्या कलाकारांना पूर्ण करावा लागतो. आपली जिद्द न सोडता जे कलाकार हा संघर्ष पूर्ण करतात, ते नक्कीच मोठे स्टार बनून इतिहास रचतात. इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, आयुष्मान खुराना, राजकुमार राव हे त्याच काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहेत.
राजकुमार रावने जेव्हा, चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, शिवाय दिसायला देखील तो जेमतेमच. त्यामुळे तो फार काळ या इंडस्ट्रीमध्ये टिकेल असं कोणालाच वाटत नव्हतं. राम गोपाल वर्मांच्या रण या पॉलिटिकल थ्रिलर सिनेमांमधून राजकुमार रावणे, चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘लव से’क्स धो’का’ या सिनेमातून त्याला ओळख मिळाली.
मात्र तरीही त्याला हवे तसे यश मिळत नव्हते. त्याच काळात रागिनी एमएमएस सारख्या सिनेमात देखील त्याने काम केले. मात्र ‘लव्ह से’क्स वर धो’का’ मधील त्याचे काम बघून अनुराग कश्यप यांनी गँग्स ऑफ वासेपुर मध्ये राजकुमार रावला काम करण्याची संधी मिळाली.
तिथूनच त्याचे नशीब पालटले. त्यानंतर तलाश, काय पो चे, शाहिद, सिटी लाइट्स, क्वीन, हमारी अधुरी कहानी, अलिगड यासारख्या सिनेमांमध्ये राजकुमार रावने आपल्या दमदार अभिनयाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला. सिटी लाइट्स सिनेमा मध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखाची केमिस्ट्री सगळ्यांना बघायला मिळाली.
राजकुमार राव त्यावेळी पत्रलेखा सोबत रिलेशनशिपमध्ये होता. सुरुवातीच्या काळात, त्या दोघांनी अनेक सिनेमासाठी सोबत ऑडिशन दिले होते. त्याच दरम्यान त्या दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रे’मात प’डले होते. सिटीलाईट सिनेमाच्या रिलीज नंतर त्या दोघांनी एकमेकांमधील प्रेमाची ग्वाही देखील दिली होती. तेव्हा पासुनच राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते बघत आहेत.
आता मात्र दोघांच्या लग्नाची तारीख ठरली असून लवकरच ते लग्न करणार आहेत. पत्रलेखा आणि राजकुमार दोघांनीही आपल्या जवळच्या व्यक्तींना, लग्नाचे आमंत्रण पाठवण्यास देखील सुरुवात केली आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, लग्नाची तारीख 10 नोव्हेंबर अशी निश्चित झाली असून आपल्या जवळच्या खास व्यक्तींना हे दोघे निमंत्रण पत्र पाठवत आहेत. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे दोघे सप्तपदी उरकणार आहेत.
राजकुमार आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच चर्चा करत नाही. मात्र पत्रलेखावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी देखील तो मागे हटत नाही. बऱ्याच वेळा सोशल मीडिया वरती ते दोघे एकमेकांसोबतचे फोटोज शेअर करत असतात. त्यांच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा अक्षरशः वर्षाव होतो. यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये चांगलीच लगीनघाई बघायला मिळत आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफ सोबतच रणबीर कपूर आणि आलिया भट देखील लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.