बॉलिवूडची ‘ही’ हॉट आणि सुंदर अभिनेत्री आहे मनोज बाजपायीची बायको, पहा ह्रतिक, अजय आणि बॉबी देओलसोबत केलंय काम..

बॉलीवूड मध्ये अनेक अश्या अभिनेत्री असतात ज्या दिसायला खूप सुंदर असतात. मात्र प्रत्येक वेळी या सुंदर अभिनेत्रींना यश मिळतेच असे नाहीये. अनेक अभिनेत्री काहीच सिनेमा करतात आणि मग बॉलीवूड मधून अचानकच गायब देखील होतात.
ग्रेसी सिंग, गायत्री जोशी, भूमिका चावला हिने, स्नेहा उल्लाल, तुलीप जोशी, गिझेल मॉन्टेल्लो या अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलीवूड मध्ये दमदार आणि मोठ्या सिनेमा हाऊस मधून पदार्पण तर केले मात्र पाहिजे तेवढे यश त्यांना नाही मिळाले. मग यापैकी काही अभिनेत्री साऊथ मध्ये काम करतात तर काही संन्यास च घेतात.
अश्याच काही अभिनेत्रींनपैकी एक आहे शबाना राझा उर्फ नेहा. शबाना राझा ने बॉलीवूड मध्ये पदार्पण करत असताना आपले नाव बदलून नेहा ठेवले. ‘चोरी चोरी जब नजरे मिली’ हे गाणं आजही अनेक, लोकांचे आवडते लव्हसॉन्ग आहे. यामध्ये बॉबी देओल सोबत दिसलेली सुंदर अशी अभिनेत्री आठवते का? नेहा ने त्यावेळी अनेक चाहते कमवले होते.
हीच नेहा मनोज वाजपेयी ची बायको आहे. द फॅमिली मॅन २ मुळे, सध्या मनोज वाजपेयी चांगलाच चर्चेमध्ये आहे. खास करून त्या सिरीजमधील, त्याची पत्नी सूची वर अनेक वेगवेगळे मिम बनवले जात आहेत. म्हणून त्याची खरी बायको कोण हे समोर आले आहे. बॉलीवूड मध्ये आपल्या सौंदर्याने एके काळी सर्वाना वेड लावणारी नेहा उर्फ शबाना राझा त्याची पत्नी आहे.
फिजा सिनेमामध्ये, ह्रितिक सोबत आजा माहिया गाण्यावर थिरकनारी नेहा, आपल्या सोज्वळ अश्या रुपामुळे खूपच चर्चेमध्ये आली होती. विधू विनोद चोप्रा यांच्या करीब या सिनेमामधून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. या सिनेमाचे म्युझिक प्रेक्षाकांच्या खूप पसंतीस उतरले होते. त्याचबरोबर नेहाच्या सौंदर्याची देखील चांगलीच चर्चा बॉलीवूड मध्ये झाली होती.
मात्र, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाहिजे तशी कमाई केली नाही. होगी प्यार कि जीत या सिनेमा मध्ये अजय देवगण सोबत तिने काम केले. आणि त्यानंतर करिष्मा कपूरचा फिझा या सिनेमामध्ये तिने, हृतिक रोशन आणि जया बच्चन यांच्यासोबत तिला काम करण्याची संधी मिळाली. तिने अजून देखील काही सिनेमामध्ये काम केले मात्र तिला हवे तसे यश मिळाले नाही.
२००६ मध्ये तिने मनोज वाजपेयी सोबत लग्न केले. नेहा आपल्या ऍक्टिंग करियर बद्दल सांगते की,’मी नेहमीच आपल्या ऍक्टिंग बद्दल पॅशेनेट होते. मात्र मला कसे रोल्स करायचे याबद्दल मी थोडी सिलेक्टिव्ह होते. आणि जे सिनेमा मी केले ते तेवढे यशस्वी नाही झाले.
काम मागण्यासाठी मी निर्मात्यांच्या दारोदारी नाही जाऊ शकत. आणि त्यामुळेच नंतर रोल्स देखील येणे बंद झाले.’ पुढे नेहा सांगते,’पण मला याचे कुह्प दुःख नाही वाटत. कारण मी माझ्या लाईफ मध्ये खुश आहे.’ मनोज आणि नेहा या दोघांना एक मुलगी देखील आहे.