बिग बॉस मराठी: हिंदी मालिकेतील ‘या’ हॉ’ट अभिनेत्रीची बिग बॉस मध्ये Wild Card एन्ट्री! देऊ शकते तगडी ट’क्कर..

मनोरंजन
बिग बॉस हा अनेकांचा आवडीचा रियालिटी शो आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडेच, मराठी बिग बॉसचा बोल-बाला बघायला मिळत आहे. बिग बॉस मराठीमध्ये, माघील काही आठवड्यामध्ये अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या. खास करून बिग बॉस मराठी मध्ये माघील आठवड्यातील एव्हिक्शनने चांगलीच चर्चा रंगवली होती. मेकर्सला अनेकांनी ट्रो’ल देखील केले.
आदिश वैद्यने काहीच आठवड्यांपूर्वी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली होती. त्याचा खेळ देखील चाहत्यांना आवडत होता. मात्र माघील आठवड्यामध्ये, अचानकच मेकर्सने त्याला घराबाहेर काढले. अर्थात इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्याला कमी मतं मिळाले, असं मेकर्स कडून सांगण्यात आले होते. मात्र तरीही, बिग बॉसच्या घरात सध्या अनेक नावडते कलाकार असल्याचे बघायला मिळत आहे.
गायत्री दातारचा खेळ चाहत्यांना, अजिबात आवडलेला नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर तिला, स्नेहाला आणि जयला बाहेर काढण्याचे अनेकवेळा चाहते बोलत आहेत. असं असलं तरीही, त्यांच्या तुलनेत आदीशला कमी मत मिळणं शक्यच नाही असं मत व्यक्त करत सोशल मीडियावर बिग बॉसच्या मेकर्सला ट्रो’ल केलं जात आहे.
सध्या, विशाल, विकास आई मीनल यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. त्यांचा खेळ चाहत्यांना आवडत आहे. मात्र आता या सर्व स्पर्धकांना अजून एक धक्का बसणार आहे. हिंदी टेलिव्हिजन मधली एक लोकप्रिय अभिनेत्री आता बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणार आहे. त्याबद्दलच एक प्रोमो देखील, बिग बॉसच्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर केले आहे.
लांब कुरुळे केस, आकर्षक फिगर आणि ये ना साजणा या गाण्यावर एक अभिनेत्री डान्स करत असल्याचे या प्रोमोमध्ये बघायला मिळत आहे. ‘धुमाकूळ घालायला मी येतेय बीग बॉसच्या घरात,’ असं म्हणत ही अभिनेत्री आता बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार हे तर नक्की झालं आहे. मात्र, प्रोमोमध्ये तिचा चेहरा दिसत नाहीये.
तरीही हि अभिनेत्री, नीता शेट्टी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नीता शेट्टी हिने अनेक हिंदी मालिकांध्ये काम केले आहे. घर कि लक्ष्मी बेटीयां या मालिकेमधून नीता शेट्टीला ओळख मिळाली होती. त्यानंतर, मानो या ना मानो, प्यार कि एक कहाणी, केशव पंडित, बनू मै तेरी दुल्हन, लाल इष्क यासारख्या मालिकांमध्ये देखील तिने काम केले होते. नो एंट्री, सासें सारख्या हिंदी सिनेमामध्ये देखील ती झळकली होती.
फुगे या मराठी सिनेमामध्ये तिने काम केले होते. त्यामधील तिच्या कामिनीच्या भूमिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. आता हीच नीता शेट्टी बिग बॉसच्या घरात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसा तिचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र, बिग बॉसच्या घरातील खेळ समजून, तिला तिथे टिकून राहता येईल का हे बघणे रंजक असेल.