‘बिग बॉस मराठी’ मधील स्पर्धकांना मिळते एवढे मानधन; पहा शिवलीला घेते ‘अव्वा च्या सव्वा’ मानधन…

मनोरंजन
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. सध्या तरी, बिग बॉस मराठीच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. एकदा बघू या, कोणत्या सदस्याला किती मानधन बिग बॉसच्या टीमकडून दिले जातात.
१. तृप्ती देसाई :- समाजसेविका तृप्ती देसाई, कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या असतात. बिग बॉसच्या घरात त्यांच्या एन्ट्रीने काहींना नवल नक्कीच वाटले तर, काही त्याचा खेळ बघण्यासाठी उत्सुक होते. आपल्या चाहत्यांच्या अपेक्षांवर काही अंशी त्या उतरल्या देखील आहेत. तृप्ती देसाईला प्रत्येक आठवड्यासाठी, २० हजार रुपये मानधन दिले जातात.
२. संतोष चौधरी :- संतोष चौधरी याना सगळेच दादूस म्हणून ओळखतात. अनेक कोळी-मराठी गाणे त्यांनी गायिले आहेत. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे,त्यामुळे त्यांना बिग बॉसच्या घरात बघण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यांना प्रत्येक आठवड्यासाठी ३७ हजार रुपये मानधन दिले जाते.
३. मीरा जगन्नाथ :- आतापर्यंत मीरा जगन्नाथ, खूप कमी लोकांना माहित होती. मात्र, अवघ्या दोनच आठवड्यात तिने बिग बॉसच्या घरातून स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे. मीराने काही सिनेमा आणि मॉडेलिंग देखील केली आहे. मीराला प्रत्येक आठवड्याचे ५५ हजार रुपये मानधन मिळते.
४. जय दुधाने :- जय यंदाच्या बिग बॉसच्या पर्वातील सर्वात महागडा सदस्य आहे. त्याने अनेक, मोठाल्या डिझायनर साठी मॉडेलिंग केली आहे. त्याचबरोबर तो स्प्लिट्सविला मध्ये देखील सहभागी झाला होता. त्यावेळी त्याची चांगलीच लोकप्रियता वाढली होती. जवळपास, १.२५ लाख रुपये मानधन म्हणून प्रत्येक आठवड्याला जय दुधनेला देण्यात येतात.
५. गायत्री दातार :- तुला पाहते रे या मालिकेमधून, गायत्री दातारने चांगलीच लोकप्रियता कमावली होती. त्यामुळेच तिला बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी मिळाली. गायत्रीला प्रत्येक आठवड्यासाठी, ४७ हजार रुपये मानधन दिले जाते.
६. स्नेहा वाघ :- स्नेहा वाघ यंदाच्या पर्वातील सर्वाधिक लोकप्रिय सदस्य आहे.मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्ये देखील स्नेहाने काम केले आहे. त्यामुळे तिने जेव्हा बिग बॉसच्या घरात जेव्हा एंट्री घेतली, तिचे चाहते तिला बघण्यासाठी खूप जास्त उत्सुक होते. स्नेहाला प्रत्येक आठवड्याला ४५ हजार रुपये मानधन दिले जात.
७. सुरेखा कुडची :- सुरेखा कुडची या संपूर्ण महाराष्ट्राच्या कलाविश्वतील एक आवडत नाव आहे. सुरेखा कुडची यांना प्रत्येक आठवड्यासाठी, ३७हजार रुपये मानधन मिळत आहे.
८. विशाल निकम :- विशाल निकम याने काही मराठी सिनेमामध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. फत्तेशिकस्त, जय भवानी जय शिवाजी, यासारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. विशालला प्रत्येक आठवड्यासाठी ५५ हजार रुपये मानधन मिळते.
९. विकास पाटील :- विकास पाटील हे मराठी छोट्या पडद्यावरील एक मोठं नाव आहे. त्याचा चाहतावर्ग देखील चांगलाच होता. त्यामुळेच त्याला बॉग बॉसमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. त्याला ४२हजार रुपये प्रत्येक आठवड्याला मानधन दिले जाते.
१०. सोनाली पाटील :- देवमाणूस या लोकप्रिय मालिकेमध्ये सोनाली पाटीलने वकिलीणबाईची भूमिका साकारली होती. अल्पावधीतच कोल्हापूरची सोनाली पाटील चांगलीच प्रसिद्ध झाली होती. सोनाली पाटीलला, प्रत्येक आठवड्यासाठी ६० हजार रुपये दिले जातात.
११. अक्षय वाघमारे :- अक्षय वाघमारेने काही मराठी सिनेमामध्ये काम केले आहे. त्याला प्रत्येक आठवड्यासाठी, ७७ हजार रुपये मानधन मिळते.
१२. मीनल शाह :- रोडीज मध्ये आपल्या दमदार व्यक्तित्वाने मिनलने सगळ्यांनाच इम्प्रेस केले होते. त्यामुळे बिग बॉसचा खेळ देखील ती उत्तम प्रकारे खेळेल अशी आशा तिच्या चाहत्यांना आहे. तिला प्रत्येक आठवड्याला ३७ हजार रुपये मानधन दिले जाते.
१३. शिवलीला पाटील :- कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यावरुन चांगलाच गोंधळ उडाला होता. शिवलीला पाटील यांना प्रत्येक आठवड्याला ७५ हजार इतके मानधन दिले जात आहे.
१४. अविष्कार दाव्हेकर :- अनेक सुपरहिट मराठी सिनेमामध्ये काम करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अविष्कार यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना प्रत्येक आठवड्यासाठी ३७ हजार इतके मानधन दिले जाते.
१५. उत्कर्ष शिंदे :- उत्कर्ष शिंदेला नव्याने ओळखीची गरज नाहीये.त्याला प्रत्येक आठवड्याला ६५ हजार इतके मानधन दिले जात आहे.