बिग बॉस मराठी : अचानक झाली सुरु आजीची एन्ट्री, सर्व स्पर्धकांनी आजीला पाहून…

मनोरंजन
बिग बॉस मराठीचा खेळ आता चांगलाच रंगात आलेला बघायला मिळत आहे. जवळपास एक महिन्यापूर्वी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. यंदाचे पर्व सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. सर्वात पहिले कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या सहभागामुळे, बिग बॉसची चांगलीच चर्चा रंगली होती.
त्यातच शिवलीला पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये झालेल्या वा’दामुळे तर सगळीकडे बिग बॉसची चर्चा बघायला मिळत होती. त्यानंतर देखील घरातील सदस्यांना चांगलीच लोकप्रियता भेटत असल्याचे बघायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर सगळीकडे विशाल निकमच्या खेळाचे चांगलेच कौतुक होत आहे. त्याचा चाहतावर्ग देखील बऱ्यापैकी वाढला आहे, त्यामुळेच सतत नॉमिनेट होऊन देखील त्याला भरभरून वोट्स मिळत आहेत.
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी, सुरेखा कुडची, स्नेहा वाघ, सोनाली पाटील, विशाल निकम, तृप्ती देसाई असे सर्व कलाकार नॉमिनेट होते. मागील आठवड्यातच अक्षय वाघमारेला सगळ्यात कमी वोट्स मिळाल्यामुळे घराच्या बाहेर यावे लागले. आणि या आठवड्यात देखील सुरेखा कुडची यांना सगळ्यात कमी मतं मिळाल्यामुळे घराच्या बाहेर पडावे लागले.
सुरेखा कुडची यांच्या बाहेर पडल्यामुळे, घरातील सदस्यांना चांगलाच मोठा ध’क्का बसला आहे. इतका मोठा चाहतावर्ग असलेल्या सुरेखा कुडची, या घराच्या बाहेर जाऊ शकतात. तर, आपण देखील घराबाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आता जवळपास सर्वच सदस्य आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न करतील, असे दिसत आहे. या आठवड्यात नक्की समीकरणे कसे बदलतील, हे बघणे नक्कीच रंजक ठरेल.
त्यातच, आता बिग बॉसच्या घरात एक नवीन एंट्री झाल्याचे बघायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात आता बिग बॉसची आजी आली आहे. नुकतच बिग बॉसच्या घरातील या आठवड्याचं प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस आपल्या आज्जीची, सर्व सदस्यांना ओळख करून देताना दिसत आहे. घरातील गार्डनमध्ये अस्सल नऊवारी लुगडे घालून, एक आजीबाई बघत बसलेल्या पाहायला मिळत आहेत.
एका आज्जीबाईचा पुतळा तिथे ठेवण्यात आला आहे. या आज्जीबाई नक्की कोण, असा प्रश्न जरी पडला असला तरी सोशल मीडियावरती त्यांचा आवाज ऐकून चर्चेला उधाण आलं आहे. देवमाणूस फेम, सरू आज्जी चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे, बिग बॉस आज्जी म्हणून, त्यांचाच आवाज ऐकायला मिळत आहे. त्या इतर कोणी नसून देवमाणूस मधील सरू आज्जीच आहेत, असा कयास लावला जात आहे.
अस्सल मराठमोळ्या आवाजात, बिग बॉसच्या आज्जी म्हणाल्या,’कार्ट्यानो किती धुडगुस घालता रे? हा पुर्ण आठवडा, माझी तुमच्यावर कडक नजर राहणार आहे. म्हणून काही वंगळ करायचा विचार पण करू नका.’ हा आवाज ऐकून सोनाली पाटीलच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलल्याचे लगेच दिसले. देवमाणूस सिरीयल मध्ये सरूआजी सोबत सोनाली पाटीलने देखील काम केले आहे.
त्यामुळे हा आवाज कदाचित त्याच सरू आजीचा असावा, असे म्हणले जात आहे. बिग बॉसच्या आज्जीच्या आवाजाची शैली, लकब अगदी सरू-आजीच्या आवाजासारखी आहे.म्हणून. आता बिग बॉसची आजी म्हणून ऐकायला मिळणारा आवाज, त्यांचा की नाही हे लवकरच समजेल. मात्र, या टप्प्यावर बिग बॉसचा खेळ बघणे चांगलेच रंजक ठरेल हे नक्की.