बिग बॉस मराठी : अंथरुणाला खिळून आहे ‘या’ स्पर्धकाचा आठ वर्षाचा मुलगा, भावुक होत म्हणाला; तो ३ वर्षाचा असताना..

मनोरंजन
एखादा चित्रपट असो किंवा दूरदर्शन, आजकाल प्रादेशिक भाषेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताने दिसत आहे. बिग बॉस मराठी या रिअॅलिटी शोची लोकप्रियता हेच सिद्ध करते की, लोकांना आपल्या भाषेत कार्यक्रम पाहायला लोकांना किती प्रमाणात आवडते. याच मुळे तर बिग बॉस मराठी आतापर्यंत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मराठी रिअॅलिटी शोपैकी एक शो आहे.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या शो नंतर आता प्रेक्षक बिग बॉस मराठीचा तिसरा रियालिटी शो बघत आहे. या शोमध्ये दिसणाऱ्या स्पर्धकांनी आपली आपली पर्सनल माहिती देखील शो दरम्यान एकमेकांशी शेयर केली आहे. त्यापैकी एक स्पर्धक म्हणजेच मराठी TV मालिकांचा गाजलेला चेहरा ज्याचे नाव विकास पाटील.
त्याच्यावर फिदा असलेल्या तरुणीची संख्या नेहमीच वाढणारी आहेत. कॉलेजच्या तरुणी त्याच्यावर जाम फिदा आहेत. तो जितका दिसायला सुंदर आहेत तितकाच अभिनय देखील छान करतो. लहान मुलांनपासून मोठ्या माणसानपर्यंत त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहेत. त्याने त्याच्या अभिनयची सुरुवात 1992 साली हमशकलं या चित्रपटातून केली. हमशकलं या चित्रपटात त्याने बालकलाकारांची भूमिमा साकारली होती.
प्रमोद समेल दिग्दर्शित चल खेळ खेळूया दोघे या चित्रपटात विकासने 2009 मध्ये एक व्यावसायिक अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटाच्या आधीही ते अनेक वर्षे रंगभूमीवर सक्रिय होता. चित्रपटात अभिनय केल्यानंतर त्याला मलाक, असा हा अतरंगी, तुझ्या विन माझं जीवन, मराठी वाघ, शेंटीमेंटल इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
ईटीव्ही मराठीच्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शो चार दिवस सासूचे पासून विकासला प्रसिद्धी मिळाली. या मालिके नंतर त्याने झी मराठीची मालिका कुलवधू मध्ये एक छोटी भूमिका केली. 2016 मध्ये, त्याला स्टार प्रवाह टेलिव्हिजन शो लेक माझी लाडकी मधून पहिल्यांदा मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. या शोमध्ये तो साकेतच्या भूमिकेत प्रिया मराठेच्या सोबत दिसला.
यानंतर त्याने सुवासिनी, माझिया माहेरा, अंतरपात, बेको आशी हावी इत्यादी प्रमुख भूमिका देखील केल्या. खुप प्रसिद्ध आणि हँडसम असणारा हा अभिनेता आहेत. पण त्याच्या जीवनात एक दुःख खुप मोठं आलं आहेत. काय आहेत ते दुःख, हेच आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये बघणार आहोत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी ३’ ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कार्यक्रमात होणारे निरनिराळे टास्क, त्यातून जिंकण्यासाठी होणारी सदस्यांची धडपड पाहून प्रेक्षकही आपल्या आवडत्या सदस्याला पाठिंबा देत आहेत. त्यात काही स्पर्धक एकमेकांना धरून खेळताना दिसत आहेत. मात्र टास्क संपल्यावर हेच स्पर्धक एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत.
घरात गप्पा मारत असताना नुकताच विकासने त्याच्या मुलाच्या आ’जारपणाबद्दल खुलासा केला. विकास त्याच्या आठ वर्षाच्या मुलाच्या आठवणीत भावुक झालेला पाहायला मिळाला आहेत.
विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांसोबत गप्पा मारत असताना विचारपूस केल्यानंतर विकासने त्याच्या मुलाची आताची परिस्थिती सांगितली.
विकास म्हणाला, ‘माझा मुलगा एकदा सोसायटीच्या मुलांसोबत खेळत होता आणि अचानक तो सोसायटीच्या पाण्याच्या टॅन्कमधे पडला. तेव्हा तो फक्त तीन वर्षाचा होता. टॅन्कमधून बाहेर काढेपर्यंत जवळपास ७- ८ मिनिटं तो पाण्यातच होता. याचा त्याच्यावर खूप मोठा प’रिणाम झाला. आता तो आठ वर्षांचा आहे. पण अजूनही तो अंथरुणाला खिळलेला आहे. सध्या त्याच्यावर डॉ’क्टरांचे उ’पचार सुरू आहेत परंतु, त्याला ठीक व्हायला अजून काही काळ जावा लागेल.’
यासोबतच विकासने त्याच्या पत्नीचे देखील आभार मानले. विकास म्हणाला, ‘माझ्या पत्नीच्या मदतीशिवाय यातील काहीही झालं नसतं. ती मुलाची खूप काळजी घेते.’ विकासच्या मुलाची परिस्थिती ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. विकासही त्याच्या मुलाच्या आठवणीत भावुक झाला होता. यापूर्वी विकासने कधीही त्याच्या मुलाचा उल्लेख केला नव्हता.