बिग बॉसच्या घर बनलं कुरुक्षेत्र; गायत्री आणि स्नेहाच असलं घाण कृत्य, स्नेहामुळे सोनालीला सगळ्यांसमोर घालावं लागलं लोटांगण..

मनोरंजन
या आठवड्यामध्ये, महेश मांजरेकरने सर्वच स्पर्धकांना आरसा दाखवत कोण किती पाण्यात आहे याची जाणीव करून दिली. त्यानंतर जवळपास सर्वच स्पर्धक विचार करत असल्याचे बघायला मिळाले. मात्र सोबतच, एक उत्तम खेळाडू आणि अभिनेता आदिशला घराच्या बाहेर जावं लागलं. त्यामुळे, बिग बॉसच्या घरात कधीही काहीही होऊ शकते.
कधीही कोणताही सदस्य, बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकते हे, सर्वच स्पर्धाकांच्या लक्षात आले आहे. म्हणून आता सर्वच स्पर्धक, कोणत्याही परिस्थतीमध्ये समोर येण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. काहीही झाले तरी, आपला खेळ चाहत्यांना दाखवण्याची चढाओढ आता सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे.
यामध्ये काही तरी करून केवळ प्रकाशझोतात येणे आणि आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सध्या सर्वच स्पर्धक करत आहेत. मात्र, असं करत असताना आपला खेळ योग्य आहे कि अयोग्य याच अनेकवेळा स्पर्धक भान सोडून देतात. बऱ्याच वेळा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात, हे स्पर्धक खूप चुकीचे वागतात. असच काही आता गायत्री आणि स्नेहाच्या बाबतीत झाल्याचं बघायला मिळत आहे.
नुकतंच बिग बॉसचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर वायरल होत आहे. यामध्ये स्नेहा, गायत्री नरकवासी असल्यामुळे, राक्षसाच्या पेहरावात त्या बघायला मिळाल्या. सध्या बिग बॉसच्या घरात, स्वर्गवासी स्पर्धकांच्या संयमाची परीक्षा असं टास्क सुरु आहे. यामध्ये नरकवासी जे काम सांगतील, ते स्वर्गवासी स्पर्धकांना करणे अनिवार्य असणार आहे. सोबतच नरकवासी, शब्दांचा प्रयोग करत स्वर्गवासी स्पर्धकांना त्रा’स देखील देऊ शकतात.
आणि त्याचाच फायदा घेत, गायत्रीने, तृप्ती देसाईला टारगेट केल्याचे या व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे. ‘तुम्ही काही नाही करत. जे करता ते कॅमेरासाठी. वैयक्तित आयुष्यात देखील तुम्ही फेक आहेत. तुमचं सगळं फक्त कॅमेरासाठी आणि प्रसिद्धीसाठी करता. स्वतःला महिलांच्या हक्कासाठी लढणारी कार्यकर्ता म्हणता आणि घरामध्ये महिलांचाच अपमान करतात.
अशी आहे तृप्ती देसाई,’ असं गायत्री दातार तृप्ती देसाईला म्हणत असल्याचं बघायला मिळत आहे. तर, तृप्ती आपला संयम ठेवून हे सर्व ऐकून घेत आहेत. सोबतच प्रोमोच्या दुसऱ्या भागामध्ये, स्नेहाने चक्क लोटांगण घालत सोनालीला झाडून घ्यायला लावल्याचे बघायला मिळत आहे. हे बघून विशालने, स्नेहल अडवण्याचा प्रयत्न केला,
मात्र तरीही तिने त्याला उलट उत्तर देत, सोनालीला लोटांगण घेत झाडून घ्यायलाच लावले. हे सर्व बघून नेटकरी मात्र चांगलेच संतापले आहे. ‘स्नेहा, तुला आम्ही वेडी समजत होतो. मात्र तू तर, आपल्या सर्वच मर्यादा सोडल्या आहेस. महेश मांजरेकरने तुला टास्क करायला सांगितलं आहे, स्वतःचे खरे रूप दाखवायला नाही सांगितलं,’ असं एका नेटकाऱ्याने लिहलं आहे.
‘गायत्री, तू एक मालिका केली आहे. तरीही तुला प्रसिद्धीची हाव आहे. म्हणून तर नेहमी जयच्या अंगावर पडलेली असतेच. काहीही असले तरीही शब्दांची मर्यादा संभाळलीच पाहिजे. तृप्ती देसाईने काय काम केले आहे ते बाहेर येऊन बघ,’ असं दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केले आहे.