बिगबॉसच्या घरात जिंकण्यासाठी तृप्ती देसाईने पार केल्या सर्व सीमा; महिलेसोबत केले घा’णेर’डे कृत्य….

बिगबॉसच्या घरात जिंकण्यासाठी तृप्ती देसाईने पार केल्या सर्व सीमा; महिलेसोबत केले घा’णेर’डे कृत्य….

मनोरंजन

रियालिटी शो आणि मनोरंजनाचा बाप म्हणून बिग बोस या रियालिटी शो कडे बघितले जाते. या शोची लोकप्रियता इतकी जास्त वाढली आहे की, केवळ हिंदीच नाही तर, बिग बॉस आता अनेक भाषांमध्ये सुरु आहे. तामिळ, कन्नड, बंगाली, मराठी अशा प्रादेशिक भाषांमध्ये देखील बिग बॉस सुरु आहे. प्रादेशिक भाषांमधील बिग बॉसदेखील चांगलेच लोकप्रिय ठरत आहे.

बिग बॉस मराठीला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, म्हणूनच आता बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला देखील आता जवळपास एक महिनाहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे, तेथील खेळ आता चांगलाच रंगात आला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील स्पर्धक आणि त्यांची जुगलबंदी बघण्याचा सर्वच जण आनंद घेत आहेत.

याच घरात, राज्यातील कीर्तनकारांविरुद्ध मोहीम चालवणाऱ्या समाजसेविका तृप्ती देसाई आणि सोबत आपल्या कीर्तनाने कमी वयात सगळीकडे ख्याती कमावणाऱ्या कीर्तनकार शिवलिलाताई पाटील या आमने सामने आल्या. कीर्तनकार शिवलिलाताई पाटील यांच्यासोबत, सुरुवातीपासूनच तृप्ती देसाईंचा वा’द पेटल्याचं बघायला मिळालं.

मात्र प्रकृती ख’राब असल्याने शिवलिलाताई पाटील यांनी, शोमधून एक्झिट घेतली. आता कदाचित तृप्ती देसाई यांचा खेळ काही वेगळा असेल असे, सर्वाना वाटत होते. मात्र तसे झाले नाही. त्यांचा खेळ अगदी वेगळ्याच पद्धतीचा आणि पातळीहीन असल्याचा आरोप, प्रेक्षक करत आहेत. सोनाली पाटील आणि शिवलीला या दोघींची चांगलीच मैत्री जमली होती, म्हणून तृप्ती सोनालीला अनेक वेळा टारगेट करत असल्याचं बघायला मिळत आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या टास्कमध्ये, एक समाजसेविका आणि तेही महिलांसाठी काम करणारी समाजसेविका असून देखील त्यांनी दुसऱ्या महिलेचा मान ठेवला नाही. त्यांच्या या कृत्यामुळे, सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. एक टास्कमध्ये, गाडीमध्ये बसलेल्या जोडीला उठवायचे होते. सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील या दोघींची जोडी गाडीवर बसलेली होती.

त्यावेळी, तृप्ती यांनी चक्क घरातील कचरा आणून त्या दोघींवर टाकला. टास्क आहे म्हणून मी असं करत आहे, असं कॅमेरासमोर येऊन सांगितलं सुद्धा. त्यांनी केलेल्या कृत्यामुळे, सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनतर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी, सोनाली सोबत देखील, चुकीचे शब्द वापरत भांडण केले.

महिला समाजसेविका असून देखील, शोमध्ये महिलांना त्या देत असलेली वागणूक पूर्णपणे चुकीची आहे, असे म्हणत अनेक प्रेक्षकांनी त्यांची शोमधून हकालपट्टी करा असे देखील म्हणले आहे. या आठवड्यामध्ये, सुरेख कुडची घराबाहेर आल्या.

त्यामुळे तृप्ती देसाईने टास्कदरम्यान केलेल्या त्या कृत्याची, पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. सध्या तृप्ती देसाई घराच्या कॅप्टन असल्यामुळे, त्या नॉमिनेट नाहीयेत. मात्र एकूणच, घरामधील त्यांचे काम बघून, नॉमिनेट झाल्यावर, प्रेक्षक नक्कीच त्यांची हकालपट्टी करतील असं चित्र दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *