‘बाहुबली’ प्रभासच्या बहिणीला पाहिलं का ? दिसते फारच सुंदर, म्हणाली, ‘या’ सवयीमुळं अजूनही सिंगल आहे भाऊ प्रभास…

बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागाला आता तब्ब्ल सहा वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र अजूनही या सिनेमाची आणि या सिनेमाच्या कलाकारांची क्रेझ कमी झालेली दिसत नाहीये. खास करुन बाहुबली प्रभासची. प्रभास हा तेलगू इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीपासूनच एक मोठा स्टार होता. मात्र, बाहुबली सिनेमा मुळे जगभरात त्याला ओळख मिळाली.
अजूनही बाहुबली प्रभास आणि त्यातील कलाकार लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावरच आहेत. सुरुवातीपासूनच प्रभासच्या जबरदस्त लूक आणि अभिनयाची चर्चा सिनेसृष्टीमधे होती. दिग्दर्शक एस एस राजामौली आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत त्याचा मिरची सिनेमा प्रदर्शित झाला होता.
तो सिनेमा सुपरहिट ठरला, त्यामुळे पुन्हा बाहुबली सिनेमामध्ये हे त्रिकुट एकत्र आले, तेव्हा तो सिनेमा देखील हिट होणारच अशी शाश्वती होती. अनुष्का आणि प्रभास जोडी सगळ्यांच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि म्हणूनच बाहुबली सिनेमाच्या आधीपासूनच त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगत होत्या. आजही या जोडीचे लाखो चाहते आहेत, मात्र आमच्या दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीच नाही असं या दोघांनी देखील वारंवार सांगितले आहे.
प्रभासच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की काय सुरु आहे, याबद्दल सर्वसामान्य तर सोडाच पण इंडस्ट्री मधील देखील खूप कमी लोकांना माहित असत. याच कारण म्हणजे प्रभास आणि त्याच संपूर्ण कुटुंब नेहमीच लाइमलाईटपासून दूर राहणेच पसंत करत. प्रसिद्ध निर्माते उपलापती सूर्यनारायण राजू हे प्रभासचे वडील आहेत. त्याला एक बहिणी देखील आहे. प्रगती उपलापती असं तिचं नाव आहे.
सोशल मीडियावर तिचे देखील अनेक चाहते आहेत प्रगती दिसायला खूपच सुंदर आहे. वडील निर्माते आणि भाऊ अभिनेता म्हणून तिलासुद्धा सुरुवातीच्या काळात सिनेमामधून काम करण्याची ऑफर आली होती. मात्र प्रगतीला लाइमलाईट पासून दूरच राहायला आवडते आणि अभिनयाच्या क्षेत्रात येण्यात तिला काहीही रस नाही असं अनेक वेळा तिने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
प्रभास आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतो, मात्र त्यासाठी सोशल मीडियावर फोटोज शेअर करत बसायला त्याला आवडत नाही. प्रभास आपल्या देशातील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. कित्येक मुली त्याच्यासोबत लग्न करण्यास तैयार आहेत. मात्र तरीही तो अजून देखील सिंगल आहे. याचं खरं कारण काय, याबद्दल प्रगतीने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
प्रभास हा कमालीचा आळशी आहे. त्यामुळे त्याला काहीच करण्यात रस नाहीये. त्याच्या या आळशी वृत्तीमुळेच तो अजूनही सिंगल आहे असं प्रगतीने सांगितले होते. एखाद्या मुलीसोबत नात्यामध्ये येणं, मग तिच्या सोबत कुठं फिरायला जाण. तिचे नखरे, किंवा तिच्या सोबत वेळ घालवणे यासाठी त्याला आळस बाजूला ठेवून, उठावं लागेल.
काही तरी करावं लागेल, मात्र हे सर्व त्याला कधीच जमणार नाही कारण आपल्या बेडवरुन उठणे हेच त्याच्यासाठी एक मोठं काम आहे, अश्या मिश्किल शब्दात प्रगतीने बाहुबली प्रभास सिंगल असण्याच कारण संगीतले आहे. मात्र, लवकरच त्याच लग्न करण्याचा विचार डोक्यात आहे असं देखील प्रगती बोलली आहे.