बाहुबलीच्या भल्लालदेवबरोबर चित्रपटात झळकणार ‘ही’ मराठी मुलगी, नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

बाहुबलीच्या भल्लालदेवबरोबर चित्रपटात झळकणार ‘ही’ मराठी मुलगी, नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

बाहुबली या चित्रपट तर सर्वांनीच बघितला असेल. त्यातील प्रत्येक कलाकाराने आपले वेगळे असे अस्तित्व निर्माण केले आहेत. आता याच चित्रपटातील भल्लालदेव सर्वानाच माहीत आहे. त्याचे अभिनयाने चित्रपट अधिकच खुलून गेला होता.

भल्लालदेव म्हणजेच बाहुबली मधील अभिनेता रामा डग्गुबती. त्याचा आता नवीन चित्रपट येत आहे. तो म्हणजे हाथी मेरे साथी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबद्धल राणाने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहिर केली आहे.

२६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. ही माहिती शेयर करताने राणाने या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलेलं दिसत आहे. त्यावेळी चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली.

“२०२१ च्या पहिल्या त्रैभाषिक चित्रपटासाठी तयार आहात का? Man VS Nature असा रोमांचक लढा घेऊन हत्तीला वाचवण्याच्या हेतूने आलो आहोत, ३ मार्च रोजी आरण्य आणि कदानचा ट्रेलर तर ४ मार्च रोजी हाथी मेरे साथीचा ट्रेलर इरॉस नाववर पाहायला मिळेल. २६ मार्च रोजी चित्रपटगृहात,” असं ट्विट राणाने केलेले दिसत आहे.

या चित्रपटाचे कथेबद्धल बोलायच झालं तर हाथी मेरे साथी या चित्रपटाची कथा ही एका माणसाच्या आयुष्यावर चित्रित केलेली दिसणार आहे. ज्या माणसाने त्याच्या आयुष्यातील बराचसा वेळ जंगलात घालवला आहे आणि त्याने त्याचे बरेच आयुष्य पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समर्पित केलेले दिसून येणार आहे.

तसेच माणूस आणि हत्ती यांच्यामधील मैत्रीची ही एक खास गोष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. खर तर ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट वेगळ्या वेगळ्या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीमध्ये त्याचे नाव ‘हाथी मेरे साथी’ असे ठेवण्यात आले आहे. तर तामिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये ‘आरण्य आणि कदान’ असे नाव या चित्रपटाचे असणार आहे.

या चित्रपटात राणा सोबत अभिनेता पुलकित सम्राट, विष्णु विशाल, अभिनेत्री श्रिया पिळगावकर, झोया हुसेन आहेत. हाथी मेरे साथी’ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने हा चित्रपट सर्वभाषीय लोकांना बघता येणार आहे.

हिंदीमध्ये हा चित्रपट ‘हाथी मेरे साथी’ या नावाने बघता येईल. तर तामिळ, तेलुगू, कन्नड या भाषांमध्ये ‘आरण्य आणि कदान’ अशा नावाने हा चित्रपट प्रदर्शित होताने दिसणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता सचिन पीळगावकर याची मुलगी श्रीया पिळगावकर ही देखील काम करताने दिसून येणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *