बालपणापासून ज्याचा फॅन होता सिद्धार्थ जाधव; आज त्याचसोबत काम करण्याची मिळाली संधी….

बालपणापासून ज्याचा फॅन होता सिद्धार्थ जाधव; आज त्याचसोबत काम करण्याची मिळाली संधी….

आपण ज्यावेळी किशोर वयात असतो, त्यावेळी एखाद्या व्यक्तीचे आपण अनुकरण करत असतो. या व्यक्तीसारखे आपल्याला भविष्यात व्हायचे आहे किंवा या व्यक्तीसोबत आपल्याला काही काळ घालवायचा आहे, असे आपल्याला नेहमी वाटत असते. चित्रपट हे समाज माध्यमाचा आरसा असतात, असे म्हणतात.

चित्रपटातील कलाकार हे सामान्य जीवनावर खूप प्रभाव पाडत असतात. अनेक तरुणांचे आयकॉन सेलिब्रिटी हे असतात. अनेकांना लहानपणी आपल्याला या कलाकारांसोबत जर काम करायला मिळत असेल, तर किती चांगले होईल असे वाटत असते. मात्र, सर्वांनाच ते शक्य होत नाही.

मात्र, काही जण हे असे स्वप्न पाहतात आणि भविष्यात याच कलाकारांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळत असते.मराठी चित्रपट सृष्टीत देखील असे अनेक कलाकार आहेत की, ज्यांनी लहानपणी असे स्वप्न पाहिले होते आणि त्याचे ते स्वप्न पूर्णत्वास देखील गेले. गेल्या वर्षभरापासून को’रो’ना म’हामा’रीमुळे सर्वत्र व्यवहार ठप्प पडले आहे.

त्यामुळे याचा फ’टका मराठी मालिकांचा चित्रपटसृष्टीला देखील बसला आहे. अनेक मराठी चित्रपटाचे चित्रीकरण हे गेल्या काही दिवसांपासून रखडली आहे. मात्र, असे असले तरी सरकारने आता चित्रीकरणाला परवानगी दिली होती. त्यानुसार आता को’रो’नाचे चे सर्व नियम पाळून चित्रीकरण हे करण्यात येत आहे.

काही मराठी मालिका व चित्रपट हे आता परराज्यात चित्रित होताना दिसत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा या मागचा हेतू असल्याचे अनेकांनी सांगितले. महेश कोठारे यांच्या अनेक मालिकांचे चित्रीकरण सध्या परराज्यात होत आहे. या लेखामध्ये आम्ही आपल्याला एका मराठमोळ्या अभिनेत्या बद्दल माहिती देणार आहोत.

या मराठमोळ्या अभिनेत्याची ओळख वेगळी अशी करून देण्याची काहीच गरज नाही. या मराठमोळे अभिनेत्याचे नाव सिद्धार्थ जाधव असे आहे. सिद्धार्थ जाधव याने आजवर अनेक मराठी चित्रपटातून काम केले आहे. तसेच त्याने हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. सिद्धार्थ जाधव आपल्या अफलातून कॉमेडी सेन्स साठी जाणला जातो.

सिद्धार्थ जाधव याने याआधी अगबाई अरेच्या, जत्रा, टाइम प्लीज या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याचा मकरंद अनासपुरे सोबत दे धक्का हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. सिद्धार्थ जाधव याने काही हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. गोलमाल आणि गोलमाल रिटर्न या चित्रपटात तो दिसला होता.

त्यानंतर रोहित शेट्टी यांच्या सिंबा या चित्रपटात देखील तो दिसला होता. सिद्धार्थ जाधव याने नुकताच एक फोटो सो’शल मी’डियावर शे’अर केला आहे. हा फोटो सध्या खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत दिग्गज दिग्दर्शक व अभिनेते प्रभुदेवा दिसताहेत.

प्रभुदेवा सोबत त्याने फोटो शेअर करून त्या खाली लिहिले आहे की, एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपण भविष्यात चित्रपटात काम करू, हे कधीही विचार करू शकत नाही. मला ती संधी मिळाली आणि मी ती संधी कधीही सोडत नाही. यावर माझा विश्वासच बसत नाही. लहानपणी मी प्रभू देवा यांच्या ‘हमसे है मुकाबला’ या चित्रपटाचे पोस्टर असलेले दप्तर शाळेत घेऊन जात होतो.

भविष्यामध्ये याच दिग्दर्शकासोबत मला काम करण्याची संधी मिळेल, असे कधीही स्वप्नात वाटले नव्हते. दप्तराचे स्वप्न जिवंत होऊन समोर येईल, असेही कधी वाटले नव्हते. असे तो म्हणाला. सिद्धार्थ जाधव हा प्रभुदेवा यांच्यासोबत ‘राधे यु आर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेता सलमान खान हा दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *