बायकोच्या हट्टामुळे दिलीप कुमार यांची ‘ही’ अखेरची इच्छा राहिली अपूर्णच…

काल सकाळपासून सगळीकडेच शोककळा पसरली आहे. बॉलीवूडच्या ट्रॅजेडी किंग अर्थात दिलीप कुमार यांचं निधन झाले. केवळ बॉलीवूडचं नाही तर संपूर्ण देशभरातून या महानायकाला श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केलं जात आहे. सर्वत्र केवळ त्यांचे किस्से, त्यांच्या आयुष्यतील समोर आलेल्या गोष्टीचीच चर्चा सुरु आहे.
३ दशकं या महानायकाने बॉलीवूडवर राज्य केलं. केवळ भारतच नाही तर, शेजारचा देश पाकिस्तानमधून देखील त्यांच्या मृ’त्यूवर शोक व्यक्त केला जात आहे. दिलीप कुमार यांची जन्मभूमी, पेशावर पा’किस्तान असल्यामुळे तिथे देखील त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. केवळ पा’किस्तानच नाही तर संपूर्ण जगभरात, त्यांचे लाखो चाहते होते.
त्यांनी आपल्या दमदार अश्या अभिनयाने कायमच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्याचा काळ त्यांनी, जबरदस्त गाजवला. देवदास, मुघले-ए-आझम हे त्यांचे असे ऐतिहासिक सिनेमा ज्यांच्या तोडीस तोड अजून सिनेमा बनला नाही आणि कदाचित बनणार देखील नाही. दिलीप कुमार कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यामुळे, त्यांच्याकडे सर्व काही होतं.
यश, कीर्ती, धन-दौलत, लाखो चाहते, आदर करणारे लोकं, तरीही या महानायकाची एक ईच्छा मात्र अपूर्ण राहिली. ही अंतिम इच्छा त्यांच्या मृ’त्यूशीच निगडित होती. काल ७ जुलै रोजी, मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते ९८ वर्षांचे होते. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
त्यांची अंतिम इच्छा होती की, त्यांचा दफनविधी त्यांच्या पालकांच्या शेजारीच व्हावा. दिलीप कुमार यांचे आपल्या आई-वडिलांवर नितांत प्रेम होते. नाशिकमधील देवळी येथे त्यांच्या आई-वडिलांचे दफनविधी करण्यात आले होते. आणि त्याच ठिकाणी किंवा आपल्या पालकांच्या शेजारीच त्यांचा देखील दफनविधी व्हावा अशी त्यांची अखेरची इच्छा होती.
यामध्ये सर्वात विशेष बाब म्हणजे आपली ही शेवटची इच्छा पूर्ण करण्याकरिता पालकांच्या कबरीशेजारीच त्यांनी स्वत:साठी सुद्धा एक जागा आधीच राखीव बुकिंग करून ठेवली होती. आपल्या आई-वडिलांच्या सानिध्यात अनंतात विलीन होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र दुर्दैव असे की, त्यांची ही इच्छा शेवटी अपूर्णच राहिली.
असं सांगितलं जात आहे की, दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांनी देवळी इथे त्यांच्या दफनविधीची सर्व तयारी देखील करून ठेवली होती. पण त्यांची पत्नी सायरा बानो यांनी यासाठी त्यांना नकार दिला. सध्याची परिस्थती बघता, अंत्यसंस्काराला गर्दी करणे चुकीचे ठरेल. आपल्या पतीची इच्छा पूर्ण व्हावी असेच प्रत्येक पत्नीला वाटते.
मात्र, नाशिकला त्यांचे पार्थिव घेऊन जाणे आणि तिथे अंत्यसंस्कार करणे यामध्ये भरपूर गर्दी जमा होईल, आणि अजूनही को’रोनाचे सं’कट पूर्णपणे दूर झालेलं नाहीये. दिलीप कुमार यांचा चाहतावर्ग भलामोठा आहे. त्यामुळे, त्यांच्या अंत्यसंस्कार विधीला चांगलीच गर्दी होऊ शकते, आणि असे करणे पूर्णपणे चुकीचे ठरेल, म्हणून नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार नाही करता येणार.
असं सायरा बानू यांच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. अखेर त्यांनी जुहू येथील कब्रिस्तानातच त्यांचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पत्नी सायरा बानू यांच्या या निर्णयामुळे दिलीप कुमार यांची अखेरची इच्छा शेवटी अपूर्णच राहिली.