बाब्बो ! मराठमोळा शरद केळकर संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडच्या भल्या-भल्या कलाकारांना देतो टक्कर, आहे एवढ्या संपत्तीचा मालक..

बाब्बो ! मराठमोळा शरद केळकर संपत्तीच्या बाबतीत बॉलिवूडच्या भल्या-भल्या कलाकारांना देतो टक्कर, आहे एवढ्या संपत्तीचा मालक..

मनोरंजन

बॉलीवूड मधील सेलिब्रिटीजचे आयुष्य पहिले की, आपल्या सर्वाना नक्कीच हवेसे वाटतं. असं चंदेरी आयुष्य, उंची घर, महागड्या गाड्या, हे सर्व बघून, ते सर्व स्वतःकडे असण्याचे स्वप्न अनेकजण बघत असतात. पडद्यावर अभिनय करावा, आपले देखील लाखो चाहते असावे, अशी अनेकांची इच्छा असते.

मोठाल्या बॉलीवूड कलाकारांकडे बघत, अनेक, सर्वसामान्य मुलं असंच मोठा कलाकार बनून यशस्वी होऊन लोकप्रिय होण्याचे स्वप्न अनेकजण बघतात. अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करतात. स्वतःच्या मेहनतीवर अनेकजणांनी ते यश प्राप्त केल्याचे आपण पहिले आहे. इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, पंकज त्रिपाठी, सुशांत सिंग राजपूत,आयुष्यमान खुराना असे अनेक कलाकार आहेत.

ज्यांनी आपल्या स्वतःच्या, मेहनतीने आज बॉलीवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा बनवली आहे. शरद केळकर देखील, याच काही मोजक्या कलाकारांपैकी एक आहे. आक्रोश या मालिकेमधून शरद केळकरने, आपल्या करियरची सुरुवात केली. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या मालिकांमध्ये त्याने काम केले. मात्र, सात फेरे या मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली.

त्यानंतर त्याने कधीच माघे वळून नाही पहिले. अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केले, आणि त्या चांगल्याच हिट देखील ठरला. लय भारी या मराठी सिनेमामध्ये त्याने साकारलेली संग्रामाची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली. अनेक हिंदी सिनेमामध्ये देखील त्याने काम केले आहे.त्याचबरोबर, अनेक दाक्षिणात्य सिनेमामध्ये त्याने काम केले.

साऊथमध्ये देखील, त्याची चांगलीच लोकप्रियता आहे. एव्हील रिटर्स, रामलीला, भूमी यासारख्या सिनेमामध्ये तो झळकला होता. अजय देवगनच्या तान्हाजी सिनेमामध्ये शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकरने खूपच उत्तम प्रकारे रेखाटली होती.यामुळे, त्याची लोकप्रियता थेट शिगेला पोहोचली.

शरद केळकरने फॅमिली मॅन या वेब सिरीजमध्ये देखील तो झळकला होता. याच काळात त्याची लोकप्रियता चांगलीच वाढलेली बघायला मिळाली. केवळ लोकप्रियतेच्या बाबतीतच नाही तर, कमाईच्या बाबतीत देखील तो बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना चांगलीच टक्कर देतो. शरद केळकरने, एमबीए केलं आहे.

आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने काही काळ, स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील काम केलं होत. त्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने, छोट्या पाडद्यावरून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. एका सिनेमामध्ये काम करण्यासाठी तो कोटींच्या घरात रक्कम घेतो. त्याची वार्षिक कमाई ५ ते १० मिलियन इतकी जास्त आहे. मुंबईमध्ये त्याचा खूप मोठं पेन्टहाऊस आहे.

केवळ मुंबईमध्येच नाही तर, हैद्राबाद आणि बंगलोर सारख्या शहरात देखील त्याचे काही फ्लॅट्स आहेत. सोबतच त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत. शरद केळकरने अगदी सामान्य स्थतीतमधून आपल्या, स्वप्नांना पूर्ण केले. आज जगभरात, त्याची ओळख आहे. आपल्या संघर्षांतून त्याने मिळवलेले यश आज, अनेकांना प्रेरणा देत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *