बाबो ! ‘सैराट’ मधील लंगड्या म्हणजेच ‘तानाजी गलगुंडे’ने केलं न्यू’ड फोटोशूट, दिला ‘हा’ मोलाचा संदेश…

किशोरवयीन प्रेमकथा, सैराट! या सिनेमाने, संपूर्ण देशात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आर्ची आणि परश्याच्या, प्रेमाची हि कहाणी सगळ्यांनाच खूप आवडली होती. सैराट ची गाणे, त्यातील अलगद आणि मनाला स्पर्श करून जाणारी प्रेमकथा आणि परश्या व त्याच्या मित्रांची मैत्री, सगळंच काही इतकं चॅन जुळून आल होत कि आजही या सिनेमाची चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा आहे.
आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. सिनेमातील ही पात्र आणि ही पात्र साकारणारे कलाकार तुफान लोकप्रिय ठरले. सैराटचे नावं घेतलं की, आर्ची आणि परश्याचे प्रेम तर आठवतेच मात्र त्याच बरोबर एक सिन आवर्जून आठवतो. लंगड्याच्या, प्रेमपत्राचा सिन आजही काहींचा अगदी आवडता असून त्या सिने चे वेगळेच चाहते आहते.
या सीनमुळे, लंगड्या खूपच प्रसिद्ध झाला होता. त्याने खूप लोकप्रियता देखील कमावली होती. आजही त्याला सगळीकडेच लंगड्या म्हणूनच ओळखलं जातं. हीच भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे ,सध्या एका वेगळ्याच कारणामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्याच चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, त्याने नुकतंच केलेलं फोटोशूट.
त्याने चक्क न्यू’ड फोटोशूट केलं आहे, आणि त्याचे फोटो तुफान वा’यरल होत आहेत. ‘होय, शरीर हे परमेश्वराची देणगी आहे आणि ते जसं आहे त्यावर आमचं प्रेमं आहे,’ असा मोलाचा संदेश तानाजीने या न्यू’ड फोटोशूटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. तानाजी या फोटोमध्ये एक गिटार घेऊन उभा आहे.
‘माझ्या पायाची रचना नीट नसेल पण माझ्या संगीताची आहे…! माझे स्वत:चे सूर उत्कृष्ट आहेत.. कारण मी मी आहे,’असं कॅप्शन तानाजीने या फोटोसोबत लिहिलं आहे. आपण नेहमीच अ’पंग आणि अधू लोकांकडे, दयेची भावना घेऊन बघतो. आपल्यासाठी त्यांची अव्था दयनीय असते, मात्र त्यांच्या साठी तेच त्यांचे आयुष्य असते.
अश्या सर्व बाबींमधून मात, करत ते सर्वसामान्य सारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात. मात्र लोकांचा आजही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला नाहीये, त्यामुळे तानाजी एक मोलाचा संदेश देत केलेल्या धाडसाचं नेटकरी कौतुक करत आहेत. दरम्यान, तानाजीच्या या खास फोटोशूटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
काही दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिनं देखील असंच एक न्यू’ड फोटोशूट केलं होतं. बॉडी शेमिंग करणायांची बोलतीच तिनं आपल्या फोटोशूट मधून बंद केली होती. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तानाजीचं नाव त्याच्या सरांनी नागराज मंजुळे यांना सुचवलं होतं. मग त्यानंतर त्याने या पात्रासाठी आॅडीशन्स दिल्या आणि त्याची निवड केली गेली. त्याने देखील ती सार्थ ठरवली.
विशेष म्हणजे तानाजीने अभिनयाचं कुठचही शिक्षण घेतलेलं नाही, नागराजजी सांगत गेले, तसं तो सिनेमात काम करत गेला. त्याचं पात्र सुद्धा मुख्य पात्रांप्रमाणेच खूप गाजलं. सैराट प्रदर्शित झाला, आणि तानाजी प्रकाश झोतात आला. पुढे त्यानं’सैराट’ च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये दमदार काम केलं.
सैराटच्या यशानंतर तो द कपिल शर्मा शो, ड्रामा कंपनी, कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, सा रे गा मा पा यांसारख्या रियालिटी शोच्या मंचावर मिरवताना दिसला. कॉमेडीची जी.एस.टी. एक्स्प्रेस, ड्रामा कंपनी मध्ये स्कीट्सही त्याने केले होतं. माझा अगडबम या सिनेमात तृप्ती भोईर आणि सुबोध भावे यांच्या सोबतही त्यानं काम केलं.