बाबो ! ‘सैराट’ मधला परश्यामध्ये झालाय एवढा बदल की आता ओळखणे देखील झालेय कठीण, पहा फोटो..

बाबो ! ‘सैराट’ मधला परश्यामध्ये झालाय एवढा बदल की आता ओळखणे देखील झालेय कठीण, पहा फोटो..

मनोरंजन

मराठी सिनेसृष्टीच नाही तर हॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा वेगवेगळे आणि नवीन लुक ट्राय करताना आपण नेहमीच बघतो. नव्या सिनेमासाठी नवीन लुक सेलिब्रिटीज घेतात, हे आपल्याला नवीन नाही. हॉलिवूड मध्ये ही ट्रेंड खूप पूर्वीपासून आहे; मात्र बॉलिवूडमध्ये ही ट्रेंड परफेक्शनिस्ट आमीर खान ने सुरू केली.

त्याने आपल्या प्रत्येक सिनेमांमध्ये भूमिकेशी एकरूप होऊन नेहमीच नवीन लुक घेतलेला आपण पाहिला आहे. आता त्यालाच अनुसरून बाकीचे सेलिब्रिटीज देखील स्वतःच्या लूक वर काम करताना आपल्याला बघायला मिळतात. जसे की पिरेड सिनेमा असेल तर, अभिनेता मोठाले केस दाढी यामध्ये बघायला मिळतात.

तर अभिनेत्री सुंदर असा कमनीय बांधा आणि सोबतच कमीत कमी मेकअप मध्ये बघायला मिळतात. बऱ्याच वेळा हे कलाकार, लूक परफेक्ट होण्यासाठी वजन कमी जास्त देखील करतात. पात्राला अनुरूप असा लूक मिळवण्यासाठी हे कलाकार चांगलीच मेहनत घेताना आपण बघितलेले आहे. सरब्जीत या सिनेमाच्या वेळी रणदीप हुडा ने तब्बल 21 किलो वजन कमी केलं होतं.

तर दम लगाके हैशा या सिनेमासाठी भुमी पेडणेकर जवळपास पंधरा ते वीस किलो वजन वाढवले होते. सुलतान सिनेमासाठी सलमान खानने देखील 10 ते 12 किलो वजन वाढवले होते. त्यामुळे कोणत्याही सिनेमातील पात्र रेखाटताना वेगवेगळे लुक्स ट्राय करणे हे काय नवीन नाही. त्यातून वेळ मिळाल्यानंतर कलाकार स्वतःचा असा वेगळा लूक देखील ट्राय करतात.

या सेलिब्रिटीजच्या वेगवेगळ्या लोकांची नवीन नवीन ट्रेंड येते. सध्या मराठी सिनेसृष्टीत एका सेलिब्रिटीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सैराट फिल्म अभिनेता आकाश ठोसरणे नुकतच एक फोटोशूट केले आहे. त्याचे फोटोज सगळीकडेच व्हायरल होत आहेत. खास करून तरुणी त्याच्या या फोटो वरती भलत्याच घायाळ झाल्या आहेत.

सैराट सिनेमा मध्ये परशाची भूमिका साकारणारा आकाश ठोसर अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आज त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र आजवर त्याला अगदी सिंपल लूकमध्ये बघायला मिळाले होते. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये त्याच्या हटके अंदाज ने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन आकाशने काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोज मध्ये आकर्षणाचा भाग ठरत आहे तो म्हणजे त्याचा हेअर कट. मेसी हेअर लूक मध्ये आकाश कमालीचा हँडसम दिसत आहे. डेनिमचर जॅकेट ज्याच्यामध्ये फक्त एक मधले बटन लावले आहे. या लूकमध्ये तो हॉट दिसत आहे.

त्यामुळे तरुणी त्याच्या फोटोज वरती भन्नाट कमेंट्स करत आहेत. ब्लॅक अँड व्हाईट फोटोज मध्ये आकाश चालू अजूनच जास्त उठून दिसत आहे. त्याच्या फोटोज वर भरभरून कमेंट्स आणि लाईक येत आहेत. अनेक तरुणींनी ‘मी तुझ्या प्रेमात पडले आहे’ असे कमेंट्स देखील केले आहे. आकाशचे हे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बऱ्याच जणांना प्रेरणा देत आहे. त्याचसोबत त्याची सुरू असलेली फिटनेसची धडपड, कोणत्यातरी जबरदस्त नवीन सिनेमाची तयारी असल्याचं संकेत देत आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *